Kurla Building Collapse Update : सरकारी मदतीआधी शिंदेकडून आर्थिक मदतीच्या थेट गुवाहाटीतून सूचना, जखमींना 1 तर मृतांच्या कुटुंबायांना 5 लाख
Eknath Shinde Kurla Building Collapse : सोमवारी मध्यरात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारत ही घटना घडली.
मुंबई : मुंबईच्या कुर्ला नेहरुनगर परिसरात घडलेल्या इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची (Kurla Buidling Collapse) अपडेट हाती येतेय. या इमारत दुर्घटनेत सरकारकडून आर्थिक मदत अद्याप जाहीर केली जायची आहे. पण त्याआधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सूचनेनुसारत स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर (Magesh Kudalkar) यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. इमारत दुर्घटनेनत जखमी झालेल्यांना 1 लाख रुपयांची तर मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. नेहरुनगरच्या नाईक नगर इथं सोमवारी रात्री चार मजली इमारत कोसळली होती. त्यानंतर या ठिकाणी बजावकार्य करत 14 जणांना वाचवण्यात आलं. तर एकाचा मृत्यू झालाय. रात्रभर या ठिकाणी बचावकार्य सुरु होतं.
पत्त्यासारखी कोसळली!
सोमवारी मध्यरात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारत ही घटना घडली. ही धोकादायक इमारत होती. तरिही या इमारतीत कुटुंब वास्तव्य करत होती. या इमारतीत राहत असलेली लोकं सोमवारी रात्री झोपेत असताना ही इमारत पत्त्यासारखी कोसळली होती.
मंगेश कुडाळकर यांचं ट्वीट :
दुःखद घटना नाईक नगर, कुर्ला (पू) येथे चार मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली. अग्निशामक , महानगरपालिका , पोलिस यंत्रणा बचाव कार्य सुरू आहे. कुटुंबियांना 1 लाख व मृत व्यक्तींना 5 लाख मा मंत्री एकनाथ शिंदे , आमदार मंगेश कुडाळकर यांच्या तर्फे करण्यात येईल @mieknathshinde pic.twitter.com/dqLciAzmIW
— Mangesh Kudalkar – मंगेश कुडाळकर (@mlamangesh) June 28, 2022
या दुर्घनटनेत अनेकजण मलब्याखाली अडकले होते. इमारत कोसळल्याचा आवाज झाल्यानं आजूबाजूला एकच गोंधळ उडालेला. याबाबतची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला आणि अग्निशमन दलाला देण्यात आली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्यास सुरुवात केली. सकाळी 6 वाजेपर्यंत बचावकार्य सुरु होतं. यश आलं होतं. या दुर्घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर एकाचा यात मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्याची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरु आहे.
कुर्ला इमारत दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्यांची नावं
चैत बसपाल, वय – 36 संतोषकुमार गौड, वय – 25 सुदेश गौड, वय – 24 रामराज रहानी, वय – 40 संजय माझी, वय – 35 आदित्य खुशावह, वय – 19 अबिद अन्सारी, वय – 26 गोविंद भारती, वय – 32 मुकेश मोर्या, वय – 25 मनिष यादव, वय – 20
अद्याप सरकारकडून कोणत्याही मदतीची घोषणा कुर्ला इमारत दुर्घटनेतील जखमी आणि मृतांसाठी करण्यात आलेली नाही.