Eknath Shinde : ‘प्रतारणा केली नाही आणि करणार नाही’ एकनाथ शिंदेचं पहिलं ट्वीट
बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असं त्यांनी आपल्या ट्वीटमधून स्पष्ट केलंय.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिलं ट्वीट केलं आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे (Anand Shinde) साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असं त्यांनी आपल्या ट्वीटमधून (Eknath Shinde Twitter) स्पष्ट केलंय. एकनाथ शिंदे यांनी 2 वाजून 32 मिनिटांनी एकनाथ शिंदे यांनी हे ट्वीट केलं. अवघ्या काही मिनिटांच्या आत त्यांचं हे ट्वीट व्हायरल झालं आहे. आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या नेतृत्त्वाचं नाव घेतलं. मात्र उद्धव ठाकरे यांचा उल्लेखही एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटमध्ये नसल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना विधानसभेच्या गटनेते पदावरुन हटवलं आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नेमणूक केली आहे.
एकनाथ शिंदे यांचं पहिलं ट्विट
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
शिवसेनेच्या गोटात पुन्हा खळबळ
दुसरीकडे शिवसेनेच्या गोटातील हलचालीही चांगल्याच वाढल्या आहेत. शिवसेने तातडीची बैठक घेत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना विधान सभेतील गटनेतेपदावरून हटवलं आहे. त्यांच्या ठिकाणी गटनेतेपदी आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गुजरातमध्येह अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत.
भाजपचं ऑपरेशन लोटस सुसाट
भाजपचं ऑपरेशन लोटसही सध्या सुसाट आहे. भाजप आमदार संजय कुटे ही सुरतमध्ये एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या भेटीला पोहोचले आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे अहमदाबादमध्ये पोहचणार आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आहेत. अमित शाह, जेपी. नड्डा यांचीही बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर काही मोठा निर्णय होऊ शकतो. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थी करण्याचं काम हे संजय राठोड, संतोष बांगर आणि दादा भुसे हे मध्येस्थी करत आहेत. मात्र यातून अजून कोणताही मार्ग निघण्याची चिन्हं दिसत नाहीत. फडणवीसांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी ठेवल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र याबाबतही काही ठोस निर्णय आला नाही.