Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Deshmukh : नितीन देशमुख पाठवले गेले की पळून आले? शिंदे गट म्हणतो, चार्टर्ड विमानानं पाठवलं, फोटोसह पुरावा

नितीन देशमुख इतर आमदारांसोबत चार्टर्ड विमानात बसलेले आणि विमानाबाहेरचे फोटो एकनाथ शिंदे गटाकडून जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे जीवावर बेतणाऱ्या प्रसंगातून सही सलामत सुटलो, असं भाष्य करणाऱ्या नितीन देशमुखांचं बोलणं किती खरंय, असाही संशय घेतला जातोय.

Nitin Deshmukh : नितीन देशमुख पाठवले गेले की पळून आले? शिंदे गट म्हणतो, चार्टर्ड विमानानं पाठवलं, फोटोसह पुरावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 3:58 PM

मुंबईः आकाश पाळण्यात बसावं… क्षणात आकाशातून जमिनीवर आणि जमिनीवरून आकाश झेप घ्यावी… महाराष्ट्रातल्या राजकारणात (Maharashtra politics) एवढ्याच जलद गतीनं सध्या उलथापालथ सुरु आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटासोबत नेल्या जाणाऱ्या वाहनातून पळून आल्याचं सांगणारे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी काही मिनिटांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आपबिती सांगितली. तर पुढच्याच क्षणी एकनाथ शिंदे गटाने पाठवलेल्या छायाचित्रातून वेगळाच दावा करण्यात येतोय. नितीन देशमुख हे सूरतच्या मार्गातून पळून आले नाहीत तर त्यांना स्पेशल चार्टर विमानानं पाठवण्यात आलंय, असा दावा आता एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येतोय. नितीन देशमुख इतर आमदारांसोबत चार्टर्ड विमानात बसलेले आणि विमानाबाहेरचे फोटो एकनाथ शिंदे गटाकडून जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे जीवावर बेतणाऱ्या प्रसंगातून सही सलामत सुटलो, असं भाष्य करणाऱ्या नितीन देशमुखांचं बोलणं किती खरंय, असाही संशय घेतला जातोय.

नितीन देशमुख म्हणाले..इंजेक्शनही टोचलं…

काही वेळापूर्वीच अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, ‘ या तोडाफोडीचे मुख्य सुत्रधार भाजपच, विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर शिंदेसाहेबांनी बंगल्यावर बोलावलं, गटनेत्याचा आदेश अंतिम असतो. मी तात्काळ बंगल्यावर गेलो, तिथं माझ्यासोबत कोल्हापूरचे आमदार प्रकाशभाऊ होते. त्यांनी आम्हाला गाडीत बसवलं, ..त्यानंतर गाडी गुजरातच्या दिशेनं निघाली. पुढं सुरतला गेल्यानतंर 5 स्टार हॉटेल होती, मोठा पोलीस बंदोबस्त होता. अनेक आयपीएस अधिकारी, जे भाजपचे गुलामगिरी करत होते. हॉटेलमध्ये गेल्यानतंर कळालं, प्रकाश गायब झाला, त्यानतंर मी साहेबांना सांगितलं, मला इथं राहण्याची इच्छा नाही मी निघतो. मी रस्त्यात आल्यनंतर माझ्यामागे पोलीसांचा 100-150 पोलीसांचा ताफा होता. 12.30-3 च्या दरम्यान रात्री मी सुसाट रस्त्यावर चालत होतो. पाऊस होता. मी शिवसेना नेत्यांसी संपर्क केला.

nitin Deshmukh

सूरतहून पळून नागपूरमध्ये आले म्हणून सांगणारे नितीन देसाई

हे सुद्धा वाचा

माझं संभाषण गुजरात पोलिसांच्या लक्षात आलं, वाहन थांबत नव्हतं. त्या 20-25 पोलिसांनी मला लाल रंगाच्या गाडीत कोंबलं, तिथं मला तिथल्या सरकारी हॉस्पीटलमध्ये नेलं. तिथं शंका आली, मला काहीही नसताना यांनी आणलं कशाला? मला तपासण्याची गरज नव्हती, तरी त्यांच्या हावभावावरुन शंका निर्माण झाली. त्यात एक डॉक्टर म्हणाला तुम्हाला हार्ट अटॅक आला. मला कळालं घातपात करण्याचा डाव आहे. कुणी हात पकडले, मान पकडली, पाय पकडले. इंजेक्शन टोचलं. मला रडू आलं, मला त्यावेळी माझी मुलगी आठवली, बायको आठवली. त्यात भाजप कसं कटकारस्थान रचत आहे. तेच मला कळालं. तिथं मी शिवरायांच्या गनिमाकाव्याचा वापर केला. त्यानंतर मी गुवाहाटीतून सुटका केली. ज्यावेळी मी शिवसेनेचा आमदार झालो, त्यावेळी माझं जेवढं स्वागत माझं झालं नव्हतं. तेवढं स्वागत माझं शिवसैनिकांनी केलं… अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वीच नितीन देशमुख यांनी दिली.

पळून आले नाहीत.. पाठवलं गेलं..

nitin Deshmukh

नितीन देसाईंना पाठवण्यात आलं.. असं सांगातना शिंदे गटानं पाठवलेला फोटो

नितीन देशमुखांनी ही आपबिती सांगितल्यानंतर काही मिनिटातच शिंदे गटाकडून त्यांचे चार्टर्ड विमानात बसवतानाचे फोटो जारी केले. नितीन देशमुख हे पळून आले नाहीत तर पाठवले गेले असल्याचं त्यांनी सांगितलं. आता कोणाचा दावा कितपत खरा आहे, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?.
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं.