Eknath Shinde vs Shivsena : उपाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका, जाणून घ्या शिंदे गटाचे याचिकेतील मुद्दे…

विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांना आज 5 वाजे पर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिलीय. विधानसभेच्या नियमांनुसार 7 दिवसांचा वेळ द्यावा लागतो. परंतु स्पीकरनं 2 दिवसांचा कालावधी दिलाय. त्यामुळे उपाध्यक्षांच्या नोटीसाला स्थिगिती देण्याची मागणी एकनाथ शिंदे गटानं केलीय.

Eknath Shinde vs Shivsena : उपाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका, जाणून घ्या शिंदे गटाचे याचिकेतील मुद्दे...
एकनाथ शिंदेImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 12:36 PM

मुंबई : राज्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील वाद वाढल्याचं दिसतंय. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ट्विटवर ट्विट करत महाविकास आघाडी आणि शिवसेनेला आव्हान देत आहेत. तर बंडखोर 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government) पाठिंबा काढल्याचं पत्र दिल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, राजकीय घडामोडीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडूनही खलबतं सुरू आहे. तर शिंदे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेतील मुद्दे समोर आले आहेत. शिंदे गटानं विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका केली होती. जाणून घ्या याचिकेतील मुद्दे..

एकनाथ शिंदे यांच्या याचिकेतील मुद्दे

  1. विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांना आज 5 वाजे पर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिलीय. विधानसभेच्या नियमांनुसार 7 दिवसांचा वेळ द्यावा लागतो. परंतु स्पीकरनं 2 दिवसांचा कालावधी दिलाय. त्यामुळे उपाध्यक्षांच्या नोटीसाला स्थिगिती देण्याची मागणी एकनाथ शिंदे गटानं केलीय.
  2. स्पीकरच्या विरोधात अविश्वास ठराव आणला आहे. 34 जणांची सही आहे.. यावर कोर्टानं निर्णय घ्यावा.
  3. अजय चौधरीं आणि सुनिल प्रभूंची गटनेता आणि प्रतोद पदाची नियुक्ती चुकीच्या पद्धतीने केली आहे. या दोघांच्या नियुक्तीला स्थगिती द्या. कारण 17 आमदारांच्या सहीने ठराव करून गटनेते पद दिलं गेलं. पण आमच्याकडे जास्त आहेत.
  4. यात दुसरा मुद्दाः त्या ठरावात 24 आमदारांनी सह्या केल्या आहेत. त्यापैकी दादा भुसे आणि उदय सामंत , केसरकर यांसह 10 आमदार एकनाथ शिंदे गटात आले आहेत. त्यांनी आपला निर्णय वापस घेतला आहे..
  5. एकनाथ शिंदे गटाच्या 16 जणांवर शिस्तभंग कारवाईची केली. पण त्यातील पण काही आमदार एकनाथ शिंदे गटाकडे आले.
  6. गटनेत्यांची नियुक्ती हे निवडून आलेले आमदार करतात, पक्ष प्रमुख नाही. म्हणून स्पीकरनं अजय चौधरींची केलेली नियुक्ती चुकीची आहे.
  7. एकीकडे आम्हाला बोलवता आणि दुसरीकडे संजय राऊत आम्हाला धमक्या देत आहेत… जीवे मारण्याची धमकी देताहेत…
  8. सुनिल प्रभू आणि अजय चौधरींनी पक्षाचे लेटर हेड वापरू नये असे याचिकेत दिले आहेत.
  9. ऊपसभापती कार्यालयाचा गैरवापर केलाय…
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.