Breaking News: बंडखोर शिवसेना आमदारांनी अखेर गुवाहटी विमानतळावर, आज गोव्यात, तर उद्या मुंबईत दखल होण्याचा प्लॅन

एकनाथ शिंदे गटातील आमदार गुवाहटीतून निघाले तर आहेत. मात्र ते गोव्यातच मुक्कामी राहणार की मुंबईत येऊन बहुमत चाचणीत उपस्थित राहणार, यावर अजूनही स्पष्टता नाहीये.

Breaking News: बंडखोर शिवसेना आमदारांनी अखेर गुवाहटी विमानतळावर, आज गोव्यात, तर उद्या मुंबईत दखल होण्याचा प्लॅन
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 5:42 PM

मुंबईः महाराष्ट्रातील सत्ता नाट्य अधिक रंगतदार होत असून यातील महत्त्वाचे सैन्य म्हणजेच एकनाथ शिंदे गट आता गुवाहटीतून बाहेर पडत आहे. मागील दहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या बाहेर असलेले शिवसेनेतील बंडखोर आमदार (Rebel MLA) अखेर गुवाहटीतून बाहेर पडले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबतचे शिवसेना तसेच अपक्ष आमदार नुकतेच गुवाहटी विमानतळावर (Guwahati Airport) दाखल झाले आहेत. येथून त्यांची विमानं गोव्याच्या दिशेने टेक ऑफ करणार आहेत. संध्याकाळी साडे पाच ते साडे सहा वाजेच्या दरम्यान, शिंदेंचा हा ताफा गोव्यात उतरणार आहे, अशी योजना आखण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांनी उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या बहुमत चाचणीला शिंदे गट उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शिंदे गटानं गुवाहटीतून बाहेर पडण्याचा निर्णय़ घेतला आहे.

गुवाहटी ते मुंबई मेगाप्लॅन काय?

  • आज आणि उद्या आसाममध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गट आजच गुवाहटीतून बाहेर पडत आहे.
  • 3 विमानांनी एकनाथ शिंदेंचे आमदार गोव्यात येतील.
  • संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत हे आमदार गोव्यात उतरतील.
  • पणजी विमानतळावरून दोन बसेसद्वारे त्यांना गोव्यातील ताज हॉटेलमध्ये जातील. येथेच त्यांचा आजचा मुक्काम असेल.
  • त्यानंतर उद्या सकाळी सात वाजेच्या सुमारास एका स्पेशल विमानाने सगळे आमदार मुंबईत येतील.
  • मुंबईतदेखील ताज हॉटेलमध्ये ते पोहोचतील. येथेच भाजप आमदारांनाही ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर एकत्र नाश्ता करून भाजप आणि बंडखोर आमदार विधानभवनाकडे जातील.

शिंदेंचे आमदार मतदानाला येणार?

एकनाथ शिंदे गटातील आमदार गुवाहटीतून निघाले तर आहेत. मात्र ते गोव्यातच मुक्कामी राहणार की मुंबईत येऊन बहुमत चाचणीत उपस्थित राहणार, यावर अजूनही स्पष्टता नाहीये. शिंदे गट बहुमत चाचणीला हजर राहिला तर हे आमदार क्रॉस वोटिंग करतील असं सांगितलं जात आहे. असे झाल्यास ठाकरे सरकार अल्पमतात येईल. शिंदे गटातील आमदारांनी मुंबईत न येता गोव्यातच मुक्काम केला तरीही संख्याबळा अभावी ठाकरे सरकारला पायउतार होणं अपरिहार्य आहे. त्यानंतर भाजप सरकार स्थापन करेल. नव्या सभापतींची निवड केली जाईल आणि नवा सभापती शिंदे गटाला ओरिजनल शिवसेनेचा दर्जा देऊन त्यांच्यावरील निलंबनाचं संकट दूर करतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.