Maharashtra Politics : वर्षावर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या 55 पैकी फक्त 18 आमदारांची हजेरी! बाकीचे शिंदेंसोबत?

Maharashtra Political crisis : दादा भुसे, संजय राठोड आणि संतोष बांगर हे एकनाथ शिंदेच्या वतीनं वर्षावर बैठकीसाठी गेले होते. तर एकनाथ शिंदेच्या समजून काढण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलीय.

Maharashtra Politics : वर्षावर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या 55 पैकी फक्त 18 आमदारांची हजेरी! बाकीचे शिंदेंसोबत?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 3:25 PM

मुंबई : एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) नाराजीचा शिवसेनेनं धसका घेतलाय की काय, अशी चर्चा रंगलीय. या पार्श्वभूमीवर वर्षावर बैठकीचं बोलावण्यात आली. तातडीनं शिवसेनेनं आमदारांची (Shiv sena MLA) बैठक बोलवली होती. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बैठकीला अवघे 16 ते 18 आमदारच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इतर आमदार बैठकी का आले नाहीत? त्यांचा पाठिंबा नेमका कुणाला आहे? एकनाथ शिंदे यांना उर्वरीत सर्व सेना आमदारांचं समर्थन आहे का? अशी शंका यानिमित्तानं घेतली जातेय. त्यामुळे राजकीय (Maharashtra Political Crisis) वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेनं त्यांना विधिमंडळाच्या गटनेते पदावरुन हटवलंय. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नेमणूक विधीमंडळाच्या गटनेते पदावर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचं राजकारण एकनाथ शिंदेच्या नाराजीच्या वृत्तानं ढवळून निघालंय.

वर्षावरील बैठकीत कोण-कोण उपस्थित?

  1. संजय राऊत
  2. दादा भुसे
  3. संजय राठोड
  4. संतोष बांगर
  5. हे सुद्धा वाचा
  6. उदय सामंत
  7. राजन विचारे
  8. सुनील प्रभू
  9. अजय चौधरी
  10. अंबादास दानवे
  11. दिलीप लांडे
  12. रमेश कोरगावकर
  13. दिपक केसरकर
  14. सचिन अहिर

कुणाकडून मध्यस्थीसाठी काय प्रयत्न?

दादा भुसे, संजय राठोड आणि संतोष बांगर हे एकनाथ शिंदेच्या वतीनं वर्षावर बैठकीसाठी गेले होते. तर एकनाथ शिंदेच्या समजून काढण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलीय.

थोडक्यात, पण महत्त्वाचं

  1. शिवसेनेचे सध्या विधानसभेत एकूण 55 आमदार
  2. 30 पेक्षा जास्त आमदार हे एकनाथ शिंदेसोबत असल्याची माहिती
  3. एकनाथ शिंदे सर्व आमदारांसोबत सूरतमधील हॉटेलात
  4. एकनाथ शिंदेचं बंड थोपवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सरु
  5. तूर्तास एकनाथ शिंदेंना विधिमंडळ गटनेते पदावरुन हटवलं
  6. एकनाथ शिंदेंच्या जागी अजय चौधरी यांची नेमणूक
  7. दुपारी अडीच्या सुमारास ट्वीट करत एकनाथ शिंदे यांचं कट्टर शिवसैनिक असल्याचं स्पष्टीकरण
  8. राजधानी दिल्लीतही घडामोडींना वेग, देवेंद्र फडणवीस दिल्लीत
  9. फडणवीसही सूरतला रवाना होणार असल्याची माहिती

एकनाथ शिंदेंपुढं कोणते पर्याय ?

1. शिवसेनेच्या नेतृत्वाची चर्चा करुन मागण्या पूर्ण करणे

2. नेतृत्वाशी चर्चा फिस्कटली तर सेनेतून बाहेर पडू शकतात

3. फुटलेल्या सेना आमदारांना घेऊन पक्ष स्थापन करु शकतात

4. शिवसेनेतच गट स्थापन करुन भाजपला पाठींबा देऊ शकतात

5. उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्यास शिंदेंच्या मदतीनं भाजप सरकार येऊ शकते

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.