Uddhav Thackeray : अजूनही उद्धव ठाकरेंच जास्त पॉवरफुल्ल! कसं? या 10 पॉईन्टमधून समजून घ्या!
Uddhav Thackeray : ज्यांच्याकडे अवघे चार मंत्री उरलेत, ते उद्धव ठाकरे आता सरकारमध्ये दुबळे पडलेत का?
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा केलाय. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारकडे (Mahavikas Aghadi Government) बहुमत नाही, असा युक्तिवाद बंडखोर आमदारांकडून केला जातोय. या राजकीय पेचात आता जास्त ताकदवर कोण? असा प्रश्न उपस्थित होतो! ज्यांच्याकडे अवघे चार मंत्री उरलेत, ते उद्धव ठाकरे आता सरकारमध्ये दुबळे पडलेत का? 9 मंत्र्यासह 40 हून अधिक आमदार आपल्याकडे खेचणारे एकनाथ शिंदे हे जास्त ताकदवर आहेत की उद्धव ठाकरे हे जास्त प्रबळ आहेत, असा प्रश्न विचारला जातोय. पक्षातील अंतर्गत ताकदीची जर तुलना केली, तर आजही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray News) हे पक्षात सरस आहेत. कसं ते दहा पॉईंटमधून समजून घ्या..
- उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असण्यासोबत शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. शिवसेनेत एकूण 12 नेते आहेत. त्यापैकी एक बंडखोर एकनाथ शिंदेही येतात. 12 पैकी एकनाथ शिंदे सोडले तर 11 शिवसेने नेते आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उबे आहेत. त्यामुळेच ठाकरे हे शिंदेपेक्षा जास्त पॉवरफुल्ल असल्याचं सध्यातरी दिसतंय.
- शिवसेनेमध्ये उपनेतेपदी 30 नेते आहेत. त्यात गुलाबराव पाटील, तनाजी सावंत आणि यशवंत जाधव यांचा समावेश आहे. हे तिघेही ठाकरेंच्या विरोधात बंड करत आहेत. पण उर्वरीत सर्व 27 उपनेते हे उद्धव ठाकरेंच्या सोबतच आहेत.
- शिवसेनेत एकूण पाच सचिव आहे. यात उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह, विनायक राऊत आणि आदेश बांदेकर यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या पाचही सदस्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय.
- शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याशिवाय एकूण 10 प्रवक्ते पक्षात आहेत. त्यात प्रताप सरनाईक यांचा समावेशही होतो. एकटे सरनाईक सोडले, तर इतर सर्व प्रवक्ते हे उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत.
- शिवसेनेकडे एकूण 18 खासदार आहेत. त्यातील एकनाथ शिंदे यांचा सुपुत्र श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी सोडल्या तर इतर सर्व 16 खासदारांचा उद्धव ठाकरेंचा पाठिंबा आहे.
- शिवसेनेच्या युवा सेनेचं नेतृत्त्व आदित्य ठाकरेंकडे आहे. त्याच्यासोबत वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण हे समर्थनात असून या दोघांनीही बंडखोरांच्या कृत्याचा निषेध नोंदवलाय.
- शिवसेनेच्या महिला आघाडीत 18 पदाधिकारी आहेत. त्यात विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचाही समावेश होते. शिवसेनेची संपूर्ण महिला आघाडी ठाकरेंसोबत आहे.
- इतर छोट्या संघटनांबाबतही ठाकरेंकडे अधिक पाठिंबा आहे, असंच दिसून येतंय. भारतीय कामदार सेनेच्या सर्वांना ठाकरेंचा राजकीय संकटात समर्थन दिलंय. भारतीय कामगार सेनेच्या मजूर आणि कामगारांच्या युनिअर एअरपोर्ट, रेल्वे, मेट्रोल, परिवहन विभाग अन्य संघटना सक्रिय असतात. यात एकूण 18 पदाधिकारी आहेत. या सर्व संघटना आणि त्यांचे पदार्धिकारी शिवसेनेसोबत आहेत.
- मराठी भाषेसाठी लढणाऱ्या संघटना आणि यूनियन्सही उद्धव ठाकरेंच्या समर्थनात उभ्या आहेत. या संघटनांमध्ये दहा हजारहून अधिक सदस्य असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. भूमिपुत्रांसाठी आणि मराठी भाषिकांसाठी काम करणारी ही संघटनांची जबाबदारी दोघा खासदारांकडे देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही खासदार ठाकरेंच्या सोबत आहेत.
- राज्यात 14 महापालिका, 208 नगर परिषद आणि 13 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. सामान्य शिवसैनिकांना या निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळण्याचा आशा आहे. या इच्छेखातर आपल्याला या बंडखोरीत संधी मिळू शकते, यासाठी अनेक कट्टर शिवसैनिकही उद्धव ठाकरेंच्या समर्थनात उभे आहेत.
शिंदेंसोबत कोण कोण?
आमदाराचं नाव | मतदारसंघ | |
---|---|---|
1 | एकनाथ शिंदे | कोपरी-पाचपाखाडी |
2 | भरत गोगावले | महाड |
3 | उदय सामंत | रत्नागिरी |
4 | संदीपान भुमरे | पैठण |
5 | गुलाबराव पाटील | जळगाव ग्रामीण |
6 | दादा भुसे | मालेगाव बाह्य |
7 | अब्दुल सत्तार | सिल्लोड |
8 | दीपक केसरकर | सावंतवाडी |
9 | शहाजी पाटील | सांगोला |
10 | शंभुराज देसाई | पाटण |
11 | अनिल बाबर | खानापूर |
12 | तानाजी सावंत | परांडा |
13 | चिमणराव पाटील | एरंडोल |
14 | प्रकाश सुर्वे | मागाठाणे |
15 | विश्वनाथ भोईर | कल्याण पश्चिम |
16 | संजय गायकवाड | बुलडाणा |
17 | प्रताप सरनाईक | माजीवडा |
18 | महेंद्र दळवी | अलिबाग |
19 | महेंद्र थोरवे | कर्जत |
20 | प्रदीप जयस्वाल | औरंगाबाद मध्य |
21 | ज्ञानराज चौगुले | उमरगा |
22 | श्रीनिवास वनगा | पालघर |
23 | संजय रायमूलकर | मेहेकर |
24 | बालाजी कल्याणकर | नांदेड उत्तर |
25 | शांताराम मोरे | भिवंडी ग्रामीण |
26 | संजय शिरसाट | औरंगाबाद पश्चिम |
27 | प्रकाश आबिटकर | राधानगरी |
28 | योगेश कदम | दापोली |
29 | सदा सरवणकर | माहिम |
30 | मंगेश कुडाळकर | कुर्ला |
31 | यामिनी जाधव | भायखळा |
32 | लता सोनावणे | चोपडा |
33 | किशोरी पाटील | पाचोरा |
34 | रमेश बोरनारे | वैजापूर |
35 | सुहास कांदे | नांदगाव |
36 | बालाजी किणीकर | अंबरनाथ |
37 | दिलीप लांडे | चांदिवली |
38 | आशिष जयस्वाल | रामटेक |
39 | महेश शिंदे | कोरेगाव |