Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या संवादनंतर एकनाथ शिंदेही घेणार 7 वाजता पत्रकार परिषद, मुख्यमंत्री काय बोलणार? याकडेही बंडखोर आमदारांचं लक्ष

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे आमदारांचं आणि एकनाथ शिंदे यांचं लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री बोलून झाल्यानंतर एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार? याचीही उत्सुकता राज्याच्या राजकारणात लागली आहे.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या संवादनंतर एकनाथ शिंदेही घेणार 7 वाजता पत्रकार परिषद, मुख्यमंत्री काय बोलणार? याकडेही बंडखोर आमदारांचं लक्ष
मुख्यमंत्र्यांच्या संवादनंतर एकनाथ शिंदेही घेणार 7 वाजता पत्रकार परिषदImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 5:47 PM

मुंबई : एककडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेही आपली भूमिका मांडणार आहेत. आपल्या सर्व आमदारांना सोबत घेऊन ते फेसबुक लाईव्ह करण्याची शक्यता आहे. तसेच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे आमदारांचं आणि एकनाथ शिंदे यांचं लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री बोलून झाल्यानंतर एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार? याचीही उत्सुकता राज्याच्या राजकारणात लागली आहे. आता सर्वात आधी मुख्यमंत्र्यांच्या फेसबुकलाईव्हकडे बंडखोर (Shivsena) आमदारांचे लक्ष असणार आहे. हॉटेलमध्ये एकत्रित सर्व आमदार आधी मुख्यमंत्र्यांचं फेसबुक लाईव्ह बघणार आहेत अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर एकनाथ शिंदे पुन्हा बैठक घेण्याची शक्यताही आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता चांगलेच बुडबुडे येताना दिसून येत आहेत. तसेच आपल्या संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणती मोठी घोषणा करणार का? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा दाखल देत भाजपसोबत सरकार स्थापन करा अशी अट ठेवली होती. त्या हिंदुत्वावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. शिवसेना आणि हिंदुत्व घट्ट आहे. कोणी एकमेकांपासून तोडू शकत नाही. त्यामुळे आदित्य एकनाथ शिंदे आमदार खासदार अयोध्येला जाऊन आले. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी कदाचित पहिला मुखय्मंत्री असेल. आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही असं काही लोक भासवत आहेत. मी काय नेमकं वेगळं केलं की बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. बाळासाहेब गेल्यानंतर 2014 ४ची एकाकी लढलो. तेव्हाही तेच होतो आताही तसेच होतो. तेव्हा ६३ आमदार आले. तेव्हाही मंत्री होतो. आता मंत्रिमंडळात तेच मंत्री आहेत. मधल्या काळानंतर जे काही मिळालं ते बाळासाहेबांच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बजावलं आहे.

एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढला

दुसरीकडे जसा वेळ जाईल तसा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढताना दिसतोय. आपल्या सेवेशी नम्रपणे निवेदन करते की स्थितीत निर्माण झालेल्या परिस्थीतीमुळे आपण व्यतीय झाला आहात. पक्षापुढे अचानकपणे आले आपणासमोर खुप गोठे आव्हाण असल्याची कल्पना गला आहे. एक शिवसैनिक म्हणून मनातही याची खंत आहे. आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाय मुद्यावर आपणास निर्णय घेण्याकरीता विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमतः हाडामासा शिवसैनिक आहेत. करीता त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कार कार्यवाही न करता कठीन असला तरी शिवसेनेकरीता निर्णय घ्यावा हीच संदेशी पुनश्च नम्र दिनती करते, असे पत्र मुख्यमंत्र्यांना आता भावना गवळी यांनी लिहिले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.