Eknath Shinde profile : एकनाथ शिंदे यांचा परिचय
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मानाचं पान असलेला शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde profile) होय.
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मानाचं पान असलेला शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde profile) होय. कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकारणाचं कौशल्य या एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde profile) जमेच्या बाजू आहेत. 2014 च्या मोदी लाटेतही शिंदेंनी ठाण्यात शिवसेनेची पडझड होऊ दिली नाही. कार्यकर्त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेण्याची क्षमता आणि ‘मास बेस’ असलेला नेता म्हणून शिंदेची ओळख आहे. आनंदराव दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यामागे शिंदेंचं योगदान मोठं आहे.
शिंदे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री (एमएसआरडीसी, सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे मंत्री होते. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. 1997 मध्ये एकनाथ शिंदे ठाणे महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत. 2019 मध्ये शिवसेना विधीमंडळाचे गटनेते म्हणून शिंदेंची नियुक्ती झाली.
एकनाथ शिंदे यांची माहिती
- मतदारसंघ : कोपरी-पाचपाखडी (ठाणे)
- पक्ष – शिवसेना
- वय – 55 वर्षे
- शिक्षण – 10 वी उत्तीर्ण
- संपत्ती – एकूण 14 कोटी
- कुटुंब – पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे