Eknath Shinde : बंडखोरांचा हाटीलातील मुक्काम अनिश्चित काळासाठी वाढला; योग्यवेळीच बाहेर पडणार

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी 51 आमदारांसह बंड केल्यानंतर हे सर्व जण गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये थांबले आहेत. आधी हे हॉटेल 20 जूनपर्यंत बुकिंग होतं. पण कोर्टाने 11 जुलै रोजी शिंदे गटाच्या याचिकेवर सुनावणी ठेवल्याने हे हॉटेल अनिश्चित काळासाठी बुकिंग करण्यात आलं आहे.

Eknath Shinde : बंडखोरांचा हाटीलातील मुक्काम अनिश्चित काळासाठी वाढला; योग्यवेळीच बाहेर पडणार
बंडखोरांचा हाटीलातील मुक्काम अनिश्चित काळासाठी वाढला; योग्यवेळीच बाहेर पडणार Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 8:26 PM

गुवाहाटी: एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde)  सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने पुढील सुनावणी 11 जुलै रोजी ठेवली आहे. त्यामुळे राजकीय अस्थिरता कायम असल्याने बंडखोरांनी गुवाहाटीतील मुक्काम वाढवला आहे. अनिश्चित काळासाठी हा मुक्काम वाढवण्यात आला आहे. तसेच हॉटेलचं बुकींगही अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे शिंदे गट इतक्यात मुंबईत येणार नसल्याची चिन्हे आहेत. तसेच सरकार स्थापन करण्यासाठीही शिंदे गट घाई करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच शिंदे गट मुंबईत येऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जातं. तोपर्यंत पुढील राजकीय रणनीती ठरवली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. भाजपसोबत (bjp) सत्ता स्थापन करायची वेळ आली तर सत्तेचा फॉर्म्युला काय असेल? नव्या सरकारमध्ये कुणाला काय संधी दिली जाईल, कुणाला महामंडळे दिली जाणार यावर पुढील काही काळ चर्चा होऊ शकते, असं सांगितलं जातं.

एकनाथ शिंदे यांनी 51 आमदारांसह बंड केल्यानंतर हे सर्व जण गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये थांबले आहेत. आधी हे हॉटेल 20 जूनपर्यंत बुकिंग होतं. पण कोर्टाने 11 जुलै रोजी शिंदे गटाच्या याचिकेवर सुनावणी ठेवल्याने हे हॉटेल अनिश्चित काळासाठी बुकिंग करण्यात आलं आहे. साधारणपणे 12 जुलैपर्यंत हे आमदार हॉटेलात राहणार असल्यांच सांगितलं जात आहे. त्यामुळे हॉटेलचा खर्चही वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. हॉटेलचा हा खर्च आमदारच करणार आहेत. शिंदे यांना सर्वजण नंतर खर्चाची रक्कम देणार असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

उद्या उपाध्यक्षांना पत्रं पाठवणार

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये आमदारांनी एकच जल्लोष केला. आपण आर्धी लढाई जिंकल्याचा दावा या आमदारांनी केला. त्यानंतर या बंडखोर आमदारांची बैठक झाली. या बैठकीत आजच्या कोर्टातील युक्तिवादाची माहिती देण्यात आली. तसेच या बैठकीत पाठिंबा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. उद्या विधानसभा उपाध्यक्षांना पाठिंबा काढल्याचे पत्र पाठवले जाणार सूत्रांनी माहिती दिली आहे. तसेच राज्यात कुटुंबीयांना संरक्षण दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आमदारांनी आभारही मानले.

भाजप म्हणतेय, वेट अँड वॉच

दरम्यान, राज्यातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्यांदाच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीला पंकजा मुंडेंसहीत भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं भाजपने म्हटलं आहे. आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नाही. मात्र, राज्यातील परिस्थितीवर आमच्या बैठकीत चर्चा झाल्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.