Shiv Sena : 15 मधून 10 उडाले! शिवसेनेकडे उरले फक्त 3 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री, तर 10 मंत्री शिंदे गटात सहभागी!

शिवसेना नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतही आज गुवाहाटीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेकडील मंत्र्यांची संख्या आता केवळ 4 वर येऊन ठेपली आहे. तर शिवसेनेतील10 मंत्री शिंदे गटात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Shiv Sena : 15 मधून 10 उडाले! शिवसेनेकडे उरले फक्त 3 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री, तर 10 मंत्री शिंदे गटात सहभागी!
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 5:36 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर 7 दिवस उलटले. अशास्थितीत महाविकास आघाडी सरकार टिकणार की पडणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेसह (Shivsena) महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकार टिकणारच असा दावा केला जातोय. तर विरोधकांकडून सरकार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशास्थितीत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह आदित्य ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात उतरले आहेत. त्याचवेळी शिवसेना नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतही आज गुवाहाटीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेकडील मंत्र्यांची संख्या आता केवळ 4 वर येऊन ठेपली आहे. तर शिवसेनेतील 10 मंत्री शिंदे गटात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रीपदासह एकूण 15 मंत्रिपदं आली होती. त्यात मुख्यमंत्रीपद, 9 कॅबिनेट मंत्रिपद आणि 4 राज्यमंत्री पदांचा समावेश होता. त्यातील 3 मंत्रिपदं शिवसेनेनं सहयोगी पक्ष आणि अपक्षांना दिलं होतं. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता शिवसेनेकडे केवळ मुख्यमंत्री, 3 कॅबिनेट मंत्री आणि 1 राज्यमंत्री उरले आहेत. तर शिंदे गटात एकूण 8 कॅबिनेट मंत्री आणि 2 राज्यमंत्री सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेकडे कोण कोण उरले ?

>> उद्धव ठाकरे – (मुख्यमंत्री) – सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय – खाती

>> सुभाष देसाई – उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

>> आदित्य ठाकरे– पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

>> अनिल परब – परिवहन, संसदीय कामकाज

शिवसेनेच्या कोट्यातून झालेले शिवसेनेकडे उरलेले मंत्री

>> शंकरराव गडाख – (कॅबिनेट मंत्री) मृदा व जलसंधारण

शिंदे गटात सहभागी झालेले मंत्री कोणते?

  • एकनाथ शिंदे – नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
  • संदीपान भुमरे – रोजगार हमी, फलोत्पादन
  • गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा व स्वच्छता
  • दादा भुसे – कृषी, माजी सैनिक कल्याण
  • संजय राठोड – वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
  • उदय सामंत – उच्च व तंत्रशिक्षण
  • शंभूराज देसाई – (राज्यमंत्री) गृह (ग्रामीण), अर्थ, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
  • अब्दुल सत्तार – (राज्यमंत्री) महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

शिवसेनेच्या कोट्यातून झालेले शिंदे गटात सहभागी मंत्री

>> बच्चू कडू – (राज्यमंत्री) जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक वि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण कामगार

>> राजेंद्र यड्रावकर – (राज्यमंत्री) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.