Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान, मुख्य प्रतोदपदी भरतशेठ गोगावलेंची नियुक्ती

एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देण्यात आलं आहे. कारण, एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं ट्विटद्वारे सांगितलंय.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान, मुख्य प्रतोदपदी भरतशेठ गोगावलेंची नियुक्ती
शिंदे विरुद्ध ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 3:56 PM

मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. कारण, एकीकडे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेल्या आमदारांना पत्र पाठवून कारवाईचा इशा दिला आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देण्यात आलं आहे. कारण, एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले (Bharat Gogavale) यांची नियुक्ती केल्याचं ट्विटद्वारे सांगितलंय. इतकंच नाही तर सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी काढलेले आजचे आदेश कायदेशीर दृष्ट्या अवैध आहेत, असा दावाही त्यांनी केलाय.

सुनील प्रभू यांचं शिवसेना आमदारांना पत्र, कारवाईचा इशारा

तत्पूर्वी शिवसेनेचे मुख्य प्रतोद यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पत्र पाठवलेलं प्रत्र समोर आलं आहे. त्यात सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांना पत्र पाठवून वर्षा निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हा पक्षाचा आदेश असून तो न पाळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराच या पत्रातून देण्यात आला आहे. सुनील प्रभू यांनी शंभूराज देसाई यांना पाठवलेलं पत्र माध्यमांच्या हाती लागलं. त्यात बैठकीला हजर न राहिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय.

बंडखोर आमदारांना पाठवलेल्या पत्रात काय?

  1. तातडीची बैठक पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न सध्या होत आहे. त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता, अशा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी 5 वाजता वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहणे सर्वच आमदारांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.
  2. उपस्थिती अनिवार्य या बैठकीला लिकित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर रहता येणार नाही. ही सूतना आमदारांना ईमेल तसेच व्हॉट्स अप तसेच समाजमाध्यमांद्वारेही पाठवण्यात आलेली आहे.
  3.  … तर स्वेच्छेने शिवसेना सोडा – दरम्यान सदर बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या आमदारांना तातडीनं पक्षातर्फे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला आहे. सदर बैठकाला आमदार उपस्थित नसतील तर स्वेच्छेने शिवसेना सोडण्याचा तुमचा इरादा आहे, असा अर्थ घेऊन संविधानातील सदस्य अपात्रते संदर्भात तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे प्रमुख प्रतोद सुनिल प्रभू यांनी दिला आहे.
Shiv Sena Letter

शिवसेनेचं पत्र

शिवसेनेचा खरा प्रमुख कोण?

एकीकडे शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना पत्र देत कारवाईचा इशारा दिलाय. तर आता एकनाथ शिंदे यांनी थेट सुनील प्रभू यांनाच प्रतोद पदावरुन हटवून गरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. इतकंच नाही तर खरी शिवसेना आपली असल्याच दावाही शिंदे यांनी काही वेळापूर्वी केलाय. त्यामुळे शिवसेनेचा खरा प्रमुख कोण. असा सवाल आता विचारला जातोय

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.