Mahayuti | किती जागांवरुन वाद? उमेदवार कधी जाहीर करणार? त्या बद्दल शिंदे गटाने दिली महत्त्वाची माहिती

Mahayuti | भाजपाने दोन दिवसांपूर्वी आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवार होते. पण 28 उमेदवारांची नाव अजून बाकी आहेत. महाराष्ट्रात शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार? याचीच उत्सुक्ता आहे.

Mahayuti | किती जागांवरुन वाद? उमेदवार कधी जाहीर करणार? त्या बद्दल शिंदे गटाने दिली महत्त्वाची माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 11:45 AM

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो. पण महायुती आणि महाविकास आघाडी दोघांमधील काही जागांवरुन असलेला तिढा अजून संपलेला नाहीय. त्यामुळेच महायुतीने त्यांचे 48 उमेदवार जाहीर केलेले नाहीत. महाराष्ट्रात याच दोन आघाड्यांमध्ये टक्कर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष या दोन आघाड्यांमध्ये आहेत. महायुतीमध्ये भाजपा मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. भाजपाने दोन दिवसांपूर्वी आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवार होते. पण 28 उमेदवारांची नाव अजून बाकी आहेत. महाराष्ट्रात शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार? याचीच उत्सुक्ता आहे. महायुतीमध्ये सर्व घटक पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शेवटी एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न आहे.

भाजपाच्या मागे फरफटत चाललोय, असा जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये संदेश जाणार नाही, याची काळजी त्यांना घ्यायची आहे. म्हणूनच हे दोन्ही पक्ष सहजासहजी कुठल्या जागेवरुन आपला दावा मागे घेणार नाही. महायुतीने महाराष्ट्रातून 45 जागा जिंकण्याच टार्गेट ठेवलं आहे. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी जागा वाटपाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. “भाजपाने त्यांच्याकडे आधीपासूनच असलेल्या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात कुठलाही वाद नव्हता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी रविवारी किंवा सोमवारी सकाळी प्रसिद्ध होईल” असं संजय शिरसाट म्हणाले.

कुठल्या जागांवरुन वाद?

“ज्या एक-दोन जागांचा वाद आहे, त्याचा तिढा आज किंवा उद्या दुपारपर्यंत संपेल अशी अपेक्षा आहे. येत्या एक दोन दिवसात मुख्यमंत्री-दोन्ही उपमुख्यमंत्री उर्वरित जागांवर उमेदवार जाहीर करतील” अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. “बारामतीमध्ये विजय शिवतारे स्वतंत्र लढणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना बोलवून समजावल आहे. कोकण तसच एक-दोन जागांचा प्रश्न आहे. एकदिलाने सर्व मिळून काम करु. सर्वांचा मिळून 45 चा आकडा पार करण्याचा प्रयत्न असेल” असं संजय शिरसाट म्हणाले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.