Eknath Shinde Tweet : ‘राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचं संरक्षण संरक्षण काढलं’ एकनाथ शिंदेंचा ट्वीटमधून सरकारवर हल्लाबोल
Eknathy Shinde : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. ते पत्र त्यांनी ट्विटरवरून प्रसिद्ध केलं आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. ते पत्र त्यांनी ट्विटरवरून प्रसिद्ध केलं आहे. “राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे”, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना पाठवलं आहे.
एकनाथ शिंदे यांचं ट्विट
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. ते पत्र त्यांनी ट्विटरवरून प्रसिद्ध केलं आहे. यात त्यांनी आपल्या मनातली सल मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली आहे. तुम्ही सुरक्षा काढून घेतली त्यामुळे आमदार आणि त्यांच्या परिवाराची सुरक्षा तुमच्या हातात आहे, असं त्यांनी म्हटलंय. “राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे”, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.#MVAisAntiShivsena pic.twitter.com/lX2qjVTxGM
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022
सध्या राज्यात काय परिस्थिती
तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तानाजी सावंत हेदेखील त्यांच्यासोबत बंड करून आसामला गेले. त्यानंतर आता राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी बालाजीनगर परिसरातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. शिवसैनिक त्याठिकाणी पोहोचले त्यावेळी पोलीस घटनास्थळी नव्हते. हाताच शिवसेनेचा झेंडा घेऊन यावेळी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. गद्दार असे कार्यालयाच्या काचांवर लिहून या काचा फोडण्यात आल्या आहेत. शिवसैनिकांनी यावेळी तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.