Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | कोर्टात फक्त कायदा चालतो लाॅजिक नाही…, अरविंद सावंत यांचे कोर्टाच्या सुनावणीवर अत्यंत मोठे विधान

अरविंद सावंत मिडियाला बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी कोणताच विषय संविधानात्मक मांडलेला नाहीयं, कायद्याचाही कुठलाही उल्लेख त्यांनी यावेळी केलेला नाहीयं. ते फक्त सातत्याने लाॅजिक मांडत होते...पण हे लक्षात येते की, लाॅजिक चालणार नाहीयं

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | कोर्टात फक्त कायदा चालतो लाॅजिक नाही..., अरविंद सावंत यांचे कोर्टाच्या सुनावणीवर अत्यंत मोठे विधान
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 12:29 PM

मुंबई : एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि शिवसेनेमधील वाद आता टोकाला गेलायं. सुप्रीम कोर्टात आज एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील शिवसेना यांच्यातील परस्पर पाच महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी झालीयं. एकनाथ शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी युक्तिवाद देखील केलायं. मात्र, कोर्टाने पुढील सुनावणी पुढे ढकलली आहे. आता यानिर्णयावर सोमवारी ( 8 आॅगस्ट) ला सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेमधील वादावरती संपूर्ण देशाचे लक्ष आहे. कोर्टामधील सुनावणीवर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी आता मोठे भाष्य केले आहे.

अरविंद सावंत यांनी केले अत्यंत मोठे भाष्य

अरविंद सावंत मिडियाला बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी कोणताच विषय संविधानात्मक मांडलेला नाहीयं, कायद्याचाही कुठलाही उल्लेख त्यांनी यावेळी केलेला नाहीयं. ते फक्त सातत्याने लाॅजिक मांडत होते…पण हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, लाॅजिक चालणार नाहीयं कायदा चालणार आहे. म्हणून न्यायालयाने त्यांच्यावरती ताशेरे ओढले. कोर्टाने त्यांना सांगितले की, आम्ही तुम्हाला 10 दिवस दिले, त्या 10 दिवसात तुम्ही काय केले? मग आता तुम्ही बोलूही नका सरळ निवेदन द्या आणि ते निवेदन आज दिले आहे, असे अरविंद सावंत म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

सावंत म्हणाले न्यायालयाने त्यांच्यावरती ताशेरे ओढले

एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवरून त्यांनी कोर्टासमोर काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्यावरती पुण्यात हल्ला करण्यात आला होता. तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज येथे सामंत यांची गाडी थांबली. त्यावेळी काही हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांची गाडी फोडली. यावरून आता राज्याचे राजकारण तापताना दिसते आहे. मात्र, या हल्ल्यात सहभागी नसणाऱ्यांची नावे घेत पोलिस त्यांना अटक करत असल्याचे अरविंद सावंत म्हणाले आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.