Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय करतायत? संजय राऊतांनी थोडक्यात सांगितलं

संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचे काही आमदार गुजरातला गेले आहेत. पण, ते आमचे शिवसैनिक निष्ठावान आहेत. ते लवकरच परत येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेवर घाव घालण म्हणजे राज्यावर घाव घालण्यासाठी आहे. मुंबईवर विजय मिळविण्यासाठी शिवसेनेला दुबळं केलं जात आहे. पण, स्वतःला किंग मेकर समजणाऱ्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय करतायत? संजय राऊतांनी थोडक्यात सांगितलं
संजय राऊतांनी थोडक्यात सांगितलंImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 11:49 AM

मुंबई : एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन गुजरातला गेले आहेत. त्यामुळं ते स्वतंत्र पक्ष स्थापन करतात की, भाजपात प्रवेश करतात, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलचं तापलंय. यासंदर्भात संजय राऊत म्हणाले, भूकंपाची भाषा करणाऱ्यांना शिवसेनेसोबत (Shiv Sena) लढावं लागेल. शरद पवार यांच्याशी काल रात्री आणि आज सकाळी चर्चा झाली. त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. पवार हे दिल्लीला (Delhi) निघालेले आहेत. ते दिल्लीत पोहचले असतील. विरोधी (Opposition) पक्षाची बैठक त्यांनी बोलावली आहे. मीही जाणार होतो. पण, या सगळ्या घडामोडी सुरू असल्यामुळं मला जाता आलं नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मला मुंबईत थांबायला सांगितलं. त्यामुळं मी इथं आहे, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं. आम्ही सगळे यासंदर्भात एकमेकांशी बोलत आहोत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र येथील सर्व सहकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचं राऊत म्हणाले.

आम्ही आमदारांच्या संपर्कात

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू आहे. काही लोकं किंग मेकर समजून काम करत आहेत. ते यशस्वी होणार नाहीत, असं मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं. काही आमदार म्हणतात की, आम्हाला गुजरातमध्ये आणलं. त्यांची व्यवस्था गुजरात भाजपचे नेते करताहेत. सूरतचे खासदार आर. सी. पाटील हे त्यांची व्यवस्था करताहेत. सर्व लोकं गुजरातला जातात. सूरतला गेल्याची माहिती मिळाली. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते परत येऊ इच्छितात पण. त्यांना परत येऊ दिले जात नाही. त्यांची घेराबंदी करण्यात आली आहे. अशाप्रकारची घेराबंदी ही गुजरातमध्येच होऊ शकते.

किंग मेकर समजणाऱ्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाही

हे सुद्धा वाचा