Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis : आमचं मॅनडेट पळवून नेण्यात आलं. तेव्हा अनैसर्गिक अलायन्स तयार झालं. अशी आघाडी फार काळ चालत नाही. हे मी आधीच सांगितलं होतं. मला मुख्यमंत्री होता आलं नाही याचा खेद नव्हता.

Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोटImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 5:30 PM

नागपूर: देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस यांचं पक्षाने खच्चीकरण केल्याचीही चर्चा रंगली होती. पक्षावरील फडणवीसांचं नियंत्रण कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात होतं. तसेच अमित शहा (amit shah) आणि फडणवीस यांच्यात सुप्त संघर्ष असल्यानेच हा निर्णय घेतला गेल्याची गेल्या तीन दिवसांपासून चर्चा होती. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना मुख्यमंत्री करण्याचा पक्षात निर्णय झाला होता. विशेष म्हणजे शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्तावच मी पक्षाला दिला होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. मला उपमुख्यमंत्रीपदाचा आग्रह केला. त्यामुळे मी ते घेतलं. उलट पक्षाने मला घरी बसण्यास सांगितलं असतं तरी मी घरी बसलो असतो. पण पक्षाने तर उपमुख्यमंत्रीपद देऊन माझा सन्मानच केला. त्यामुळे मला हे पद मिळाल्याची कोणतीच खंत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरला आले. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. जेपी नड्डा, अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्या संमतीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं. शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव मी दिला. तो मंजूर झाला. मात्र, त्यावेळी मी बाहेर राहील असं ठरलं होतं. पण नंतर राज्यपालांना भेटल्यानंतर नड्डा यांनी मला फोन केला. अमित शहा बोलले. सरकारमध्ये जाण्याची माझी तयारी नव्हती. बाहेर राहून सरकारला मदत केली पाहिजे, अशी इच्छा होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्याशी बोलले. सरकार बाहेर राहून चालत नाही. सरकारमध्ये गेलं पाहिजे, असे आदेश वरिष्ठांनी दिले. सरकार चालवण्यासाठी माझ्या वरिष्ठांचा आदर करत मी उपमुख्यमंत्रीपद घेतलं. मला त्यात काहीच कमीपणा वाटत नाही. शिंदे आज नेते आहेत. त्यांना माझं सहकार्य आहे. ते सफल मुख्यमंत्री झाले पाहिजे त्यासाठी मी सर्वाधिक योगदान देणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

विचारासाठी एकत्रं आलो

शिवसेनेत अस्वस्थता होती. त्यामुळे शिवसेनेत उठाव झाला. त्याला आम्ही साथ दिली. हे बंड नव्हते. तो उठाव होता. आमचा विचार तुडवला जातोय. पक्ष कमी केला जातोय ही खदखद त्यांच्यात होती. त्यामुळे ते आमच्यासोबत आले. आमच्या पक्षाने निर्णय केला. आम्ही सत्तेसाठी हपापलो नाही. आम्ही आग्रह धरला असता तर मुख्यमंत्रीपद आमच्याकडे आलं असतं. आमच्याकडे 115 आमदार होते. पण सत्तेसाठी नव्हे तर विचारा करता शिवसेनेचाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. शिंदेंकडे मुख्यमंत्रीपद गेलं, असं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र नंबर वन करू

आमचं मॅनडेट पळवून नेण्यात आलं. तेव्हा अनैसर्गिक अलायन्स तयार झालं. अशी आघाडी फार काळ चालत नाही. हे मी आधीच सांगितलं होतं. मला मुख्यमंत्री होता आलं नाही याचा खेद नव्हता. सरकार न आल्याचं दु:ख याासठी होतं. आलेल्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या गतीला ब्रेक लावला होता. विकासाचे सर्व प्रकल्प थांबवण्यात आले. शेतकरी हिताचे प्रकल्प थांबवले. इंडस्ट्रियल ग्रोथवर त्याचा परिणाम झाला. विदर्भ आणि मराठावाड्याला प्रचंड अन्याय केला. आता महाराष्ट्राची गाडी पटरीवर आणू. मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्र नंबर वन करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.