बारसं करायला निवडणूक आयोग काय शिवसेनेची आत्या नाहीये; उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं

गोवंश बंदी महाराष्ट्रात आहे. इतर राज्यात नाही. त्रिपुरातील भाजपचा प्रदेशाध्यक्ष गोमांस खातो. संघाचे होसबळे म्हणतात, गोमांस खाणाऱ्यांना दरवाजे बंद करता येणार नाहीत. मग तुमचं हिंदुत्व नेमकं आहे तरी कसं?

बारसं करायला निवडणूक आयोग काय शिवसेनेची आत्या नाहीये; उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 8:48 AM

मुंबई | 26 जुलै 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीका केली आहे. पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. आमचा पक्ष इतरांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. उद्या मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचं नाव बदललं तर? निवडणूक आयोगाने शिवसेनेचं बारसं केलं नव्हतं. कानात येऊन नाव सांगायला निवडणूक आयोग काय शिवसेनेची आत्या लागत नाहीये. ते नाव माझ्या आजोबांनी दिलंय. ते शिवसेना प्रमुखांनी घेतलं. म्हणून तर त्यांना शिवसेनाप्रमुख म्हणतात, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ठणकावलं.

कोणीही उठले आणि शिवसेनाप्रमुख व्हायला लागले तर लोक जोड्याने मारतील. आणि जेव्हा जोड्याने फिरतील तेव्हाच येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांना हात घातला.

हे सुद्धा वाचा

तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ

रामशास्त्री बाण्याचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात आहे. आमच्या बाजूनेच निकाल दिला तर त्यांचा बाणा सिद्ध होईल असं नाही. शिवसेनेने जे कोर्टात मांडलंय ते संविधानाला अनुसरून आहे. संविधानात जे लिहिलं ते पुसून टाकता येत नाही. संविधानाच्या तरतुदीला धरूनच आहे. नाही तर तुम्हाला संविधान बदलावं लागेल. घटना बदलावी लागेल, असं सांगतानाच आम्ही आता निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. उद्या विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी दरवाजे उघडे आहेत. आणि तिकडे सर्व सुनावणी झालेली आहे, असंही ते म्हणाले.

राज्याला विसरू नका

उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. अजित पवार अडीच वर्ष माझ्यासोबत होते. त्यांनी अर्थ खातं सांभाळलं. सत्तेच्या साठमारीत राज्याला विसरू नका हेच मी त्यांना सांगितलं, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्यात हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या. मग आरोप खरे की अजितदादा खरे? असा सवाल त्यांनी केला.

त्यांचं हिंदुत्व स्पष्ट करावं

मणिपूर हिंसेवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मणिपूर दिलीत चिनी ड्रॅगन शिरला आहे. गोमूत्र शिंपडल्यावर ते परत जातील का? हे हिंदुत्व नाहीये. देशाचं रक्षण करणं हे हिंदुत्व आहे, असं सांगतानाच देशभक्ती, राष्ट्रभक्ती, देशाचं संरक्षण हे माझं हिंदुत्व आहे. त्यांचं हिंदुत्व त्यांनी स्पष्ट करावं. त्यांच्या हिंदुत्वाला शेंडा बुडखा आहे काय? त्यांचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय?, असा सवाल त्यांनी केला.

मग त्यांच्यावर कारवाई का नाही?

गोवंश बंदी महाराष्ट्रात आहे. इतर राज्यात नाही. त्रिपुरातील भाजपचा प्रदेशाध्यक्ष गोमांस खातो. संघाचे होसबळे म्हणतात, गोमांस खाणाऱ्यांना दरवाजे बंद करता येणार नाहीत. मग तुमचं हिंदुत्व नेमकं आहे तरी कसं? एकीकडे तुम्ही गोवंश हत्याबंदी करता, दुसऱ्या ठिकाणी कोणाकडे गोमांस सापडलं तर संशयावरून मारून टाकता. मॉब लिचिंग होतं. दुसऱ्या राज्यात मात्र गोमांस खाऊ देता. भाजपचे नेतेच गोमांस खातो म्हणून सांगतात. मग त्यांच्यावर कारवाई का करत नाही? असा सवाल त्यांनी केला.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.