मोठी ‘कला’टणी… एक्झिट पोल फोल?, तीन राज्यात भाजप महाविजयाकडे; काँग्रेसने मोठं राज्य गमावलं

चार राज्यातील निवडणुकांचे कल हाती आले आहेत. त्यापैकी तीन राज्यात भाजपला बंपर विजय मिळताना दिसत आहे. तर काँग्रेसला केवळ एका राज्यात विजय मिळताना दिसत आहे. या चारपैकी राजस्थान आणि मध्यप्रदेश या बड्या राज्यात भाजपला निर्विवाद सत्ता मिळताना दिसत आहे. छत्तीसगडमध्येही भाजपची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. तर तेलंगणात काँग्रेसला सत्ता मिळताना दिसत आहे.

मोठी 'कला'टणी... एक्झिट पोल फोल?, तीन राज्यात भाजप महाविजयाकडे; काँग्रेसने मोठं राज्य गमावलं
BJPImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 11:30 AM

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चारही राज्यांचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये या चारही राज्यात काँग्रेस आघाडीवर होती. काँग्रेसची सत्ता येईल असंच वातावरण होतं. त्यामुळे काँग्रेस कार्यालयाबाहेर जल्लोषही करण्यात येत होता. मात्र, जसजशी मतमोजणी पुढे सरकत गेली, तस तसा कल भाजपच्या दिशेने झुकू लागला आहे. या कलांनाच कलाटणी मिळाली आहे. चारपैकी तीन राज्यातील कलांमध्ये भाजप आघाडीवर आहे. या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता येत असल्याचं दिसत आहे. तर काँग्रेस केवळ एका राज्यात सत्ता स्थापन करणार असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे सत्ता असलेलं मोठं राज्य गमावण्याची वेळही काँग्रेसवर आली आहे.

सध्याच्या कलानुसार मध्यप्रदेशात भाजपची पुन्हा सत्ता येताना दिसत आहे. भाजपला मध्यप्रदेशात बंपर विजय मिळताना दिसत आहे. कलानुसार राज्यात भाजप 159 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 67 जागांवर आघाडीवर आहे. मध्यप्रदेशात पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान यांची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवराज सिंह चौहान यांनी शेवटच्या टप्प्यात राज्यात लाडली योजना लागू केली. त्याचा फायदा असंख्य लोकांना झाला. त्यामुळेच लोकांनी पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान यांच्यावर विश्वास दाखवल्याचं बोललं जात आहे.

राजस्थान गेले?

राजस्थानातून काँग्रेसची सत्ता जाताना दिसत आहे. राजस्थानात भाजप विजयी होताना दिसत आहे. राजस्थानात भाजपला 100 तर काँग्रेसला 78 जागा मिळताना दिसत आहेत. इतरांचा 15 जागांवर विजय होताना दिसत आहे. काँग्रेसचा राजस्थानातील हा सर्वात मोठा आणि नामुष्कीकारक पराभव असल्याचं दिसत आहे. हातात सत्ता असूनही काँग्रेसला राज्य राखता आलेलं दिसत नाही. तसेच राज्यातील जनता काँग्रेसच्या कारभारावर खूश नसल्याचंही यातून दिसून येत आहे.

छत्तीसगडचंही स्वप्न भंगलं

दरम्यान, सकाळी छत्तीसगडमध्येही काँग्रेस आघाडीवर होती. त्यामुळे काँग्रेसची छत्तीसगडमध्ये सत्ता येईल असंच बोललं जात होतं. पण हा अंदाजही फोल ठरला आहे. छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेच्या दिशेने कूच करताना दिसत आहे. छत्तीसगडमध्ये भाजपला 48 तर काँग्रेसला 41 जागा मिळताना दिसत आहेत. भाजप सध्या आघाडीवर असला तरी छत्तीसगडमध्ये अजूनही फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तेलंगणाने दिलासा दिला

तेलंगणात मात्र काँग्रेसला अच्छे दिन आल्याचं दिसून येत आहे. तेलंगणात काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तेलंगणात काँग्रेसला 66 तर सत्ताधारी बीआरएस पार्टीला अवघ्या 45 जागा मिळताना दिसत आहेत. भाजपला मात्र केवळ तीन जागांवर आघाडी मिळाली आहे. एमआयएमला चार जागांवर आघाडी दिसत आहे.

एक्झिट पोल फेल?

बहुतेक एक्झिट पोलने राजस्थानमध्ये भाजप आणि मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचं भाकीत वर्तवलं होतं. पण एक्झिट पोलचं हे भाकीत खोटं ठरताना दिसत आहे. या दोन्ही राज्यात भाजपचीच सत्ता येताना दिसत आहे. तर काही एक्झिट पोलचा आकडा खरा ठरताना दिसत आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.