Vijay Vadettiwar | कोरोना रुग्ण वाढल्यास निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील, वडेट्टीवारांचं मोठं विधान
संसर्ग वाढू नये याची काळजी घेणारे नियम करावे लागू नये, यासाठी प्रयत्न करावे. मात्र वाढ झाली तर राज्य सरकार यावर निर्णय घेईल. कोरोना रुग्ण वाढल्यास निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील, असं मोठं विधान राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय.

नागपूर : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या (corona patient) वाढत आहे. या परिस्थितीला सामोरे जावं लागेल. निर्बंधाची आवश्यकताच पडू नये यासाठी लोकांनी काळजी घ्यावी. स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. पुढची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेण्यात येईल. शाळा महाविद्यालये सुरू होतात. पावसाला सुरुवात होईल. म्हणून संसर्ग वाढू नये (infection should not increase) याची काळजी घेणारे नियम करावे लागू नये, यासाठी प्रयत्न करावे. मात्र वाढ झाली तर राज्य सरकार यावर निर्णय घेईल. कोरोना रुग्ण वाढल्यास निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील, असं मोठं विधान राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय. पुढचे 8 ते 10 दिवस महत्वाचे आहेत. निवडणुकीला अजून वेळ आहे. मात्र परिस्थिती उद्भवली तर निवडणूक आयोगाला (EC) विनंती करावी लागेल, असंही ते म्हणाले.
राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात
राज्यसभा निवडणुकीसंदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले, राजकीय वातावरण तापलंय. त्यामुळं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सामान्य जनतेला यांच्याशी काही देणे-घेणे नाही. भलत्याच गोष्टीकडे आम्ही चाललो. निवडणूक बिनविरोध व्हावी. लोकप्रतिनिधी या संदर्भात भावना बदलत असतात. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. सहाव्या जागेसंदर्भात वरिष्ठ नेते ठरवतील. ते निर्णय घेतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासंदर्भात विधान केलं. याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत मी ऐकली नाही. त्यांची भूमिका पक्षहिताची असेल तर पक्ष विचार करेल. आम्ही निवडणूक प्रोसेसमधून जातोय. काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी गांधी घरण्यासह आणखी काय करू शकतो. अशी असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. सर्वांना अशा परिस्थितीतून जाऊ शकतो. काँग्रेस पुन्हा मजबूत होऊ शकते. दिवस सारखे नसतात, असं वडेट्टीवार म्हणाले. नवसंकल्पच्या माध्यमातून काँग्रेस सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्राने कडक भूमिका घ्यावी
काश्मीर किलिंगसंदर्भात वडेट्टीवार म्हणाले, काश्मिरी पंडितांचा मुद्दा आपण पाहिले आहेत. त्या काळातील परिस्थिती निवळले होती. पर्यटक जात होते. हे हल्ले केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. केंद्राने कडक भूमिका घ्यावी. उपयोजना करावी, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. दरम्यान, संघप्रमुखांच्या भूमिकेच स्वागत आहे. लोकांना, धर्म पंतांना जोडण्याची स्वागत आहे. ही भूमिका कायम राहिली पाहिजे. जुन्या गोष्टी उकळून काढणे आणि वाद निर्माण करणे हे टाळण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो मात्र ही भूमिका कायम राहिली पाहिजे, असंही ते म्हणाले. काँग्रेस हिंदूबाबत ते म्हणाले, काँग्रेसची भूमिका सर्वधर्म समभावाची आहे. धर्म घरी आणि संविधान मानणारे आम्ही आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.



