कपिल पाटलांच्या जन-आशीर्वाद यात्रेची सांगता; नवी मुंबईत यात्रेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल
भाजपच्या एकूण 7 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचाही समावेश आहे. कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेचं नवी मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी आयोजकांवर गर्दी जमवल्याच्या कारणाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन-आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर नवी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील NRI सागरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपच्या एकूण 7 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचाही समावेश आहे. कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेचं नवी मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी आयोजकांवर गर्दी जमवल्याच्या कारणाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेची आज सांगता झाली. (End of Union Minister of State Kapil Patil’s Jan-Ashirwad Yatra)
कपिल पाटील यांच्या जन-आशीर्वाद यात्रेची सांगता
जोरदार पावसातही जन आशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरणारा प्रचंड जनसमुदाय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने दिलेला मोठा आशीर्वाद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शुक्रवारी केले. जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कटीबद्ध राहू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा आज पाचव्या दिवशी दुपारी भिवंडी जवळ दिवे अंजूर येथे जाहीर सभेने समारोप झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
तत्पूर्वी सकाळी अंजुर फाटा येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. काल्हेर येथे जाहीर सभेत त्यांनी केंद्रीय योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय मंत्रीपद दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र व ईमेल पाठवून आभार व्यक्त करण्याचे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले. माणकोली नाका येथे वृक्षारोपणानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या प्रसंगी आमदार महेश चौगुले, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह अनेक स्थानिक नगरसेवक तथा पदाधिकारी उपस्थित होते.
कल्याणच्या दुर्गाडी चौकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
दोन दिवसांपूर्वी कल्याणच्या दुर्गाडी चौकातून पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली होती. टिटवाळ्यात त्याचा समारोप झाला. कल्याणच्या दुर्गाडी चौकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. सोमवारी जन आशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी डोंबिवली येथील नागरी सहकारी बँकेच्या ठिकाणी भाजप कार्यकत्यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर, नंदूकिशोर परब, जिल्हाध्यक्ष शशीकांत कांबळे यांच्यासह 5 जणांच्या त्याचप्रमाणे कोळसेवाडी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण खडकपाडा पोलिसातही गुन्हा दाखल
यात्रेच्या आयोजनाकरीता कल्याण खडकपाडा, महात्मा फुले चौक पोलिसांनी जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे सह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भादवि कलम 188 269 270, सह साथीचा रोग कायदा 1857 कलम 2,3,4, सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 ( ब ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (135 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
इतर बातम्या :
End of Union Minister of State Kapil Patil’s Jan-Ashirwad Yatra