केंद्राचा वीज क्षेत्राच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडा, ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा हल्लाबोल

अभियंता भवनाच्या सुंदर वास्तूत अभियंत्यांना राहण्याची उत्तम व्यवस्था होईल. तसेच विचारांची देवाणघेवाण करायला हक्काची जागा उपलब्ध होईल, अशा सदिच्छा व्यक्त करत सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या अभियंता भवनला डॉ नितीन राऊत यांनी शुभेच्छा दिल्या.

केंद्राचा वीज क्षेत्राच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडा, ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा हल्लाबोल
नितीन राऊत, ऊर्जामंत्री
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 9:25 PM

मुंबई : वीज क्षेत्राच्या (Electricity Department) खासगीकरणाचा केंद्र सरकारचा (Central Government) डाव कार्यक्षमता दाखवून हाणून पाडा, असे आवाहन ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज केले. सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनने पनवेल येथे उभारलेल्या सुंदर व सुरेख अशा अभियंता भवनचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज आभासी पद्धतीने  उद्घाटन केले. “महाराष्ट्रातील वीजक्षेत्र अनेक आव्हाने व अडचणीतून वाटचाल करत आहे. सर्व अभियंते ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी सर्वोत्तम कार्य करत आहेत. मात्र केंद्रसरकार वेगवेगळया युक्त्या, दुरूस्ती सुचवून खाजगीकरणाच्या दिशेने एकेक पाऊल टाकत आहे. केंद्र शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्व संघटनांनी कारभारामध्ये कार्यक्षमता आणण्यासाठी सहकार्य करावे,”असे आवाहन यावेळी डॉ राऊत यांनी केले.

अभियंता भवनाच्या सुंदर वास्तूत अभियंत्यांना राहण्याची उत्तम व्यवस्था होईल. तसेच विचारांची देवाणघेवाण करायला हक्काची जागा उपलब्ध होईल, अशा सदिच्छा व्यक्त करत सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या अभियंता भवनला डॉ नितीन राऊत यांनी शुभेच्छा दिल्या. या भवनात वैचारिक देवाण घेवाणीतून महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपन्याची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविण्यासाठी सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन पुढाकार घेईल, असा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

‘राष्ट्रनिर्माण कार्यात अभियंते महत्वपूर्ण भूमिका बजावतात’

राष्ट्रनिर्माण कार्यात अभियंते महत्वपूर्ण भूमिका बजावतात. सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनने 1981 साली अभियंत्यांच्या अस्मितेसाठी जो अभूतपूर्व असा जो संप घडवून आणला व यशस्वी करून दाखविला, याबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत सर्व अभियंत्यांचे त्यांनी कौतुक केले. देश स्वतंत्र झाला त्या वेळेस देशाची वीजनिर्मितीची स्थापित क्षमता केवळ 1360 मेगा वॅट इतकी होती व दरडोई वर्षाला वीजवापर फक्त 6 युनिट होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाने, पंडित जवाहरलाल यांच्या दूरदृष्टीने व अभियत्यांच्या अथक प्रयत्नाने आज देशाची वीजनिर्मितीची स्थापित क्षमता ऑक्टोबर 2021 अखेर 3 लाख 90 हजार 700 मेगा वॅट इतकी झालेली आहे. तसेच दरडोई वार्षिक वापर आता 1280 युनिटच्यावर आहे. यामुळे राज्याच्या व देशाच्या विकासात विजेचा व अभियत्यांचा फार मोठा वाटा आहे. यामुळे विजेला “विकासाचे इंजिन” म्हणतात अशा शब्दांत सर्व अभियंत्यांचा राऊत गौरव केला.

‘7 लाख रोहित्राद्वारे 3 कोटींच्यावर वीजग्राहकांना अखंडपणे व दर्जेदार वीज पुरवठा’

महाराष्ट्रामध्ये देशातील पहिली 400 के.व्ही. लाईन अभियंत्यांनीच कार्यान्वित केली. आज महाराष्ट्राची निर्मितीची स्थापित क्षमता 13 हजार 182 MW एवढी असून महापारेषण चे जवळजवळ 700 ईएचव्ही चे उपकेंद्रे आहेत. महावितरणचे 4 हजाराच्यावर उपकेंद्र कार्यान्वित असून 7 लाख रोहित्राद्वारा 3 कोटींच्यावर वीजग्राहकांना अखंडपणे व दर्जेदार वीज पुरवठा केला जातो. ते केवळ अभियंताच्या पुढाकारामुळे शक्य झाले असल्याचे राऊत म्हणाले.

इतर बातम्या :

तेरणा साखर कारखान्याचा प्रश्न अखेर मिटला, कारखाना आमदार डॉ. तानाजी सावंतांकडे 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर

‘गृहपाठ न केल्यानं तोंडघशी पडावं लागलं’, एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राजू शेटींचा सदाभाऊंना टोला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.