Eknath Shinde : सत्ता आल्यानंतरही फडणवीस टेन्शनमध्ये होते, कारण कळल्यावर एकनाथ शिंदेही निरुत्तर झाले; वाचा काय आहे किस्सा?
राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. याचाच अनुभव गेल्या दोन महिन्यात राज्यातील जनतेने घेतला आहे. दरम्यान, सत्ता स्थापनेची सर्व गणिते जुळल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. महिन्याभरातील राजकीय घडामोडीनंतर आता मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचीच घोषणा होणार हे सर्वांनीच मानले होते.
मुंबई : (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यानंतर सत्तांतर होणार हे निश्चित होते. शिवाय एकनाथ शिंदे यांच्यासमोर कोणता पर्याय? याचा अंदाजही सर्वसामान्य जनतेने लावला होता. सत्ता स्थापनेच्या दाव्यापर्यंत सर्वकाही नियोजनाप्रमाणेच सुरु होते पण त्यानंतरच्या घटना ह्या बुचकळ्यात टाकणाऱ्या आहेत. (Swearing-in) शपथविधीपूर्वी (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली पत्रकार परिषद आजही कोणी विसरु शकलेले नाही. या परिषदेमध्ये फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे असणार अशी घोषणा केली. त्यामुळे तो तुम्हा-आम्हालाच धक्का नव्हता तर खुद्द एकनाथ शिंदेही अचंबित झाले होते. हा धक्का जसा सर्वासाठी होता त्यापेक्षा अधिक धक्का हा देवेंद्र फडणवीस यांना पक्ष श्रेष्ठींनी दिला, तो म्हणजे उपमुख्यमंत्री पद घेण्याचा आदेश देऊन, हे सर्व असले तरी सत्ता स्थापन होऊन आता दीड महिना उलटला आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पद घेण्यास कसे तयार झाले हे खुद्द एकनाथ शिंदे यांनीच सांगितले आहे.
मुख्यमंत्री पदाच्या घोषणेनंतरही फडणवीस आनंदीच
राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. याचाच अनुभव गेल्या दोन महिन्यात राज्यातील जनतेने घेतला आहे. दरम्यान, सत्ता स्थापनेची सर्व गणिते जुळल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. महिन्याभरातील राजकीय घडामोडीनंतर आता मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचीच घोषणा होणार हे सर्वांनीच मानले होते. मात्र, फडणवीस यांनी धक्कातंत्र देत मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे राहतील असे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर काम केलेल्या व्यक्तीला उपमुख्यमंत्री पद कसे? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनाही पडलेला होता. मात्र, फडवणीस यांनी माझ्या नावाची घोषणा केली त्यावेळी देखील ते आनंदी होते. पण पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्री होण्यास सांगितल्यावर ते अस्वस्थ झाल्याचे शिंदे एका कार्यक्रमात म्हणाले आहेत.
म्हणून तयार झाले फडणवीस..
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा निर्णयाने फडणवीस यांचे डिमोशन झाल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.शिवाय मुख्यमंत्री पदी राहिलेला माणूस उपमुख्यमंत्री म्हणून कसे काम करणार असा सवालही अनेकांच्या मनात निर्माण झाला पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की मी याबाबत त्यांनाही विचारले होते. यावर आमची चर्चाही झाली पण पक्षाचा आदेश तो आदेशच, तो मान्य करावाच लागेल असे फडणवीस म्हणाले होते.
अडीच वर्ष मुख्यमंत्री अशा शब्दच दिला नव्हता
ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जर आम्ही बिहारमध्ये नितीशकुमार यांचे आमदार कमी असताना त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो शिवाय तुमचे 50 आणि भाजपाचे 106 असताना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करु शकतो तर आम्ही शब्द दिला असता का फिरवला असता असे स्पष्टीकरण गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे अमित शाह यांनी असा कोणताच शब्द ठाकरे यांना दिला नसल्याचे स्पष्ट होते असाच शिंदे यांच्या वक्तव्याचा अर्थ होता. त्यामुळे जो आरोप शिवसेनेकडून सातत्याने केला जातो तो खोडून काढण्याचा प्रयत्न आता एकनाथ शिंदे यांनीच केला आहे.