राष्ट्रवादीला बारामतीतून, काँग्रेसला साकोलीतून पराभूत करायचं, तर मशालला?; चंद्रशेखर बावनकुळे यांचं नेमकं टार्गेट काय?

दोन शाखा प्रत्येक आठवड्यात तयार करा आणि शंभर मतांचं अॅडिशन करा. मी या गोष्टींचं ऑडिट करणार आहे. जे काम करतील त्याच पदाधिकाऱ्यांना पदाधिकारी म्हणून अप्रुव्ह देणार.

राष्ट्रवादीला बारामतीतून, काँग्रेसला साकोलीतून पराभूत करायचं, तर मशालला?; चंद्रशेखर बावनकुळे यांचं नेमकं टार्गेट काय?
राष्ट्रवादीला बारामतीतून, काँग्रेसला साकोलीतून पराभूत करायचं, तर मशालला?; चंद्रशेखर बावनकुळे यांचं नेमकं टार्गेट काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 12:47 PM

विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा कोणत्याही परिस्थितीत पराभव घडवून आणण्याचा चंगच बावनकुळे यांनी बांधला आहे. महाविकास आघाडीचे (mahavikas aghadi) प्रचंड वाईट हाल होणार आहेत. घडी बारामतीतून बंद करायची. पंजा साकोलीतून थांबवायचा. साकोली हा नाना पटोलेंचा (nana patole) मतदारसंघ आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाच्या मतदारसंघातून पंजा थांबवायचा. मशालला वरळीतून थांबवायची आहे. वरळीतील पाणी घेऊन मशाल विझवायची आहे, असं आवाहनच चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

राहुल लोणीकर यांची भाजयुमोच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ते भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला पराभूत करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केलं.

हे सुद्धा वाचा

मशालने काँग्रेसची संस्कृती स्वीकारली आहे. वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला या मशालने साथ दिली आहे. त्यांची मशाल काँग्रेसच्या हाती आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करायचा आहे. उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आणि उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे राष्ट्रवादीला मत देणं आहे. हा तुमच्या भाषणाचा मुख्य भाग असला पाहिजे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आपण ‘धन्यवाद मोदीजी’ ही मोहीम सुरू करत आहोत. या मोहिमेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे धन्यवाद मानणारे पत्रं लिहियाचं आहे. जेव्हा दोन कोटी लाभार्थी मोदींना पत्रं लिहितील. तेव्हा मोदी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून घेतली. तुमच्या राज्यातील लोक मला एवढे पत्रं पाठवतात. एखादी चाळीस पन्नास हजार कोटीची कोणती योजना असेल तर घेऊन जा, असं मोदी आपल्या नेत्यांना म्हणतील. खरे तर पत्रं लिहिण्यामागचा हा आपला स्वार्थ आहे. भावना तर आहेच. पण योजना मिळावी हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे, असंही ते म्हणाले.

प्रत्येक बुथवर 100 मतांचं राजकारण करा. युवा वॉरियर शाखेचं उद्घाटन करा, दुसरं धन्यवाद मोदीजी लिहिलेले पत्रं मोदींना पाठवा. प्रत्येकाने 2100 पत्रं पाठवावीत. युवा मोर्चाचं टार्गेट 15 नोव्हेंबरपर्यंत दीड लाखाचं असेल. फेब्रुवारी 2024पर्यंत 50 लाख पत्राचं टार्गेट आहे, असं त्यांनी सांगितलं.

दोन शाखा प्रत्येक आठवड्यात तयार करा आणि शंभर मतांचं अॅडिशन करा. मी या गोष्टींचं ऑडिट करणार आहे. जे काम करतील त्याच पदाधिकाऱ्यांना पदाधिकारी म्हणून अप्रुव्ह देणार. ज्यांना कामं करायचं आहे, तेच नेता होतील. केवळ पद घेऊन बसणारे नेते नकोत, असा इशाराही त्यांनी दिला.

नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.