सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर, ठाकरे पितापुत्राने राजीनामा द्यावा, निलेश राणेंची मागणी
बिहार सरकारच्या काऊन्सिलने आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले, सुप्रीम कोर्टाने ते नाव काढून टाकले नाही. आरोपी म्हणून यांचं नावही त्या रेकॉर्डवर गेलं आहे, असे निलेश राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग : “अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाच पाहिजे” अशी मागणी माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. (Ex MP Nilesh Rane Demands Aditya Thackeray CM Uddhav Thackeray Resignation in SSR Death Case)
“आदित्य ठाकरे यांचे नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवर येणे, ही साधी गोष्ट नाही. बिहार सरकारच्या काऊन्सिलने नाव घेतले आणि सुप्रीम कोर्टाने ते नाव काढून टाकले नाही. आरोपी म्हणून यांचं नावही त्या रेकॉर्डवर गेलं आहे” असे निलेश राणे म्हणाले.
“26-11 नंतर राम गोपाल वर्मासोबत ताज हॉटेलमध्ये पाहणी करायला गेलेल्या विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आज तर मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव मर्डर मिस्ट्रीमध्ये रेकॉर्डवर आलं आहे. हे पण तेवढंच गंभीर आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री व आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिलाच पाहिजे. तपासणी कामात मुलाला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री गडबड करु शकतात, म्हणून राजीनाम्याची मागणी केली आहे” असे निलेश राणे ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचीत करताना म्हणाले.
उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले… की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 11, 2020
“संजय राऊत यांना जास्त महत्त्व देऊ नका, ते शिवसेनेच्या पगारावर असल्यामुळे ठाकरे कुटुंबाला खुश करणे हे त्यांचे काम आहे” अशी एकेरी भाषेतील टीका निलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केली.
इथे वाचा संपूर्ण प्रकरण : बिहार निवडणुकांमुळे सुशांतच्या मृत्यूचे राजकारण, महाराष्ट्राचा दावा, तिवारी क्वारंटाईन प्रकरणही गाजले, सुप्रीम कोर्टात काय काय झाले?
“राजस्थानमध्ये काय घडलं हे सचिन पायलट यांना जाऊन विचारा, गेहलोत साहेबांना विचारा. सचिन पायलटना गेहलोत साहेबच निक्कमा, नाकारा म्हटले होते. त्यांचा आपसातला वाद होता, त्यात सचिन पायलट यांनी माती खाल्ली, आमदार टिकत नसल्यामुळे परत गेले. भाजप कशाला मध्ये पडेल, तुमच्या संसारातला तो वाद आहे, बसून सोडवा” असेही निलेश राणे म्हणाले. (Ex MP Nilesh Rane Demands Aditya Thackeray CM Uddhav Thackeray Resignation in SSR Death Case)
“ऑपरेशन लोटस फेल कसं जाईल, ऑपरेशन लोटस केलंच नव्हतं. संजय राऊत यांना कसेही करुन विषय डायव्हर्ट करायचे आहेत, मूळ विषयापासून सगळं दुसरीकडे वळवायचं असतं, म्हणून त्यांचे हे प्रयत्न असतात, नेहमीच असतात” असा घणाघातही निलेश राणे यांनी केला.
पाहा व्हिडीओ :
निलेश राणे यांचे बंधू आणि भाजप आमदार नितेश राणे यांनीही आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्या राजीनाम्याची मागणी काल केली होती.
Wouldn’t it be fair if the Maharashtra cabinet minister who was named today in the apex court shud resign so there is a fair trail in the SSR case? Or R the rules different here ??
— nitesh rane (@NiteshNRane) August 11, 2020
(Ex MP Nilesh Rane Demands Aditya Thackeray CM Uddhav Thackeray Resignation in SSR Death Case)