Devendra Fadnavis : फडणवीस मित्र पक्षांची बैठक घेणार, सत्ता स्थापनेचा प्लॅन? की मविआ पाडण्याचा डाव?
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक असल्याची माहिती आहे. तर मित्र पक्षांची फडणवीस बैठक घेणार असल्याची देखील मोठी माहिती मिळतेय. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. फडणवीस नेमकं काय बोलणार? ठाकरे सरकार पाडण्याचा हा डाव तर नाहीय ना, याबाबतही चर्चा रंगली आहे.
मुंबई : राज्यात सत्ताधारी शिवसेनेमध्ये (Shivsena) दोन गट पडले असून त्यावरुन प्रचंड घमासान माजलंय. एकीकडे शिंदे (Eknath Shinde) गटाकडून बंड पुकारण्यात आलं. तर भाजपकडून देखील हलचाली सुरू झाल्याचं दिसतंय. विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्रातील भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस तब्बल दहा तासांनंतर मुंबईत दाखल झाले आहेत. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक असल्याची माहिती आहे. तर मित्र पक्षांची फडणवीस बैठक घेणार असल्याची देखील मोठी माहिती मिळतेय. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. फडणवीस नेमकं काय बोलणार? ठाकरे सरकार पाडण्याचा हा डाव तर नाहीय ना, याबाबतही चर्चा रंगली आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्याती महाविकास आघाडी सरकार अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या हलचाली होत असून भाजपच्या हलचालींकडेही संशयाच्या नजरेनं पाहिलं जातंय.
मात्र, देवेंद्र फडणवीस दिल्लीत कुणाला भेटले, याबाबत अजूनही गुप्तता पाळली जातेय. पहिल्या फळीच्या नेत्यांना फडणवीस भेटले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत कोअर कमिटीच्या बैठकीत ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, दुसरीकडे फडणवीस मित्र पक्षांसोबत चर्चा करणार असून ही चर्चा नेमकी कशाची असणार? ठाकरे सरकार म्हणजे महाविकास आघाडी पाडण्याची? की नवं सरकार स्थापन करण्याची? याबाबत चर्चा रंगलीय.
कोअर कमिटीच्या बैठकीकडेही विशेष लक्ष असणार आहे. या बैठकीत नव्या सरकार स्थापनेबाबत काही बोललं जातं का , भाजपही पुढची रणनीती आखली जाते का, यावर देखील लक्ष असणार आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस शांत असून त्यांनी ठाकरे सरकारवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे कोअर कमिटीत काय होतं, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.
तरीही पाटील म्हणतात ;…भाजपचा संबंध नाही’
राज्यातील घडणाऱ्या घटनांविषयी भाजपचा जोडला गेलेला संबंध चुकीचा असल्याचं यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.
कोअर कमिटीत सत्ता स्थापनेचा निर्णय?
यापूर्वी भाजप नेते मोहित कंबोज आणि संजय कुटे शिंदे गटासोबत दिसून आले होते. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की, ‘भाजपाकडे कोणीही सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव सादर केलेला नाही. त्यांनी सांगितले की, भाजपाच्या निर्णयप्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयांवर राज्याची कोअर कमिटी विचारविनिमय करून भूमिका निश्चित करते व केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली जाते, त्यानंतर पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे आता कोअर कमिटीत सत्ता स्थापनेवर चर्चा होते की सरकार पाडण्यावर ते पहावं लागेल.
शिंदेंचं सुचक वक्तव्य, भाजपच्या हलचाली
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यात महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, ठाकरे सरकार अल्पमतात येण्याची चिन्ह असताना फडणवीस शांत कसे, असा सवाल आता विचारला जातोय. फडणवीस सत्ता स्थापनेचा प्लॅन तर करत नाहीयत ना? ठाकरे सरकार पाडण्याचा डाव फडणवीस आखत नाहीयत ना, असेही काही प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. दरम्यान, दुसरीकडे संयम पाळा चार दिवसात नवं सरकार बनणार, असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांना दिल्यानं भाजपच्या प्रत्येक हलचालीकडे संशयानं बघितलं जातंय.