Sharad Pawar | ‘आम्ही थोडी खिडकीला…’, शरद पवार-अदानी भेटीवर काँग्रेसने काय म्हटलं?

Sharad Pawar | प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या गौतम अदानी हे भाजपाच्या जवळचे मानले जातात. त्यांना काँग्रेसकडून सातत्याने लक्ष्य केलं जातं.

Sharad Pawar | 'आम्ही थोडी खिडकीला...', शरद पवार-अदानी भेटीवर काँग्रेसने काय म्हटलं?
gautam adani sharad pawar meet
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 1:43 PM

रवी खरात 

मुंबई : रात्री उशिरा प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. गौतम अदानी स्वत: शरद पवार यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक निवासस्थानी गेले होते. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात बंद दाराआड काहीवेळ चर्चा झाली. गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट का घेतली? या भेटीमागे काय कारण आहे? ते अजून स्पष्ट नाहीय. या भेटीमागे विविध अर्थ लावले जात आहेत.  सध्याच्या राजकीय परिस्थिती गौतम अदानी हे भाजपाच्या जवळचे मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गौतम अदानी यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात सुद्धा जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अदानी यांनी पहिल्यांदा शरद पवार यांची भेट घेतलेली नाही. यापूर्वी सुद्धा गौतम अदानी यांनी शरद पवार आणि मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. सध्या देशात एअरपोर्ट बंदरापासून वेगवेगळ्या क्षेत्रात अदानी समूह वेगाने विस्तारत आहे. गौतम अदानी यांच्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अनेकदा निशाणा साधला आहे. सध्या इंडियात आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. अशावेळी अदानी आणि पवारांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

धारावी पूनर्विकास हे भेटीच कारण का?

अदानी समूह धारावीचा पूनर्विकास करणार आहे. त्या विरोधात अलीकडेच ठाकरे गटाने मोठा मोर्चा काढला होता. अदानी आणि शरद पवार भेटीमागे हे एक कारण असू शकते.

‘अदानी हा काय कळीचा मुद्दा नाही’

काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. हा विषय आमचा नाही. या संदर्भात पवार साहेबांना विचारलं तर बरे होईल. आम्ही थोडी खिडकीला कान लावून बसलो आहोत” अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली. “भेट झाली पण यात महाविकास आघाडीचा संबंध काय? अदानी हा काय कळीचा मुद्दा नाही, धारावी प्रकल्पाच्या ज्या अटी-शर्ती आहेत, त्याला आमचा विरोध आहे. कोण कोणाला भेटतय यावर महाविकास आघाडीचं भविष्य नाही, शरद पवार आणि अदानी यांचे फार जुने संबंध आहेत” असं संजय राऊत म्हणाले. “मला नाही माहित. पण त्यांनी अनेकांना काल भेटी दिल्यात” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.