AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gopichand Padalkar | पवारांवरील विधानानंतर गोपीचंद पडळकरांविरोधात पहिला गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणं गोपीचंद पडळकर यांना भोवलं आहे (FIR against BJP MLA Gopichand Padalkar).

Gopichand Padalkar | पवारांवरील विधानानंतर गोपीचंद पडळकरांविरोधात पहिला गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 1:51 PM

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणं गोपीचंद पडळकर यांना भोवलं आहे (FIR against BJP MLA Gopichand Padalkar). एकिकडे राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होत निषेध आंदोलन करत आहेत. दुसरीकडे आता बारामतीत गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकरांच्या या वक्तव्यावर त्यांच्याविरोधात दाखल झालेला हा राज्यातील पहिला गुन्हा आहे. राज्यात इतर ठिकाणी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी होती आहे. त्यामुळे पडळकर चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने शहर पोलीस स्टेशनला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रार अर्ज दिला होता. तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर पोलिसांनी संबंधित तक्रारीवरुन आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर 505(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित तक्रारीत म्हटलं आहे, “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 2017 मध्ये भारत सरकारचा क्रमांक 2 चा नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तसेच ते भारताचे माजी कृषीमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री आहेत. असं असतानाही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविरोधात द्वेष निर्माण होईल अशा हेतूने विधान केलं. यात त्यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असं विधान केलं. कोरोना हा जगभरात संसर्ग होत असलेला साथीचा महारोग आहे. असं असताना पडळकरांनी शरद पवार यांची तुलना कोरोनाशी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आणि संपूर्ण बारामतीकरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांचे हे वक्तव्य द्वेष पसरवणारे आहे. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याचा धोका आहे.”

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले होते?

भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते.

शरद पवार हे राजकीय विरोधक, ते शत्रू नाहीत, पडळकरांच्या टीकेवर फडणवीसांचं भाष्य

पडळकरांच्या टीकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं. “शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे असे शब्द वापरणं चुकीचं आहे,” असे फडणवीस म्हणाले.

“मी गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली. पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणं चुकीचं आहे. कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत,” असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. सोलापुरातील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संबंधित बातम्या :

Gopichand Padalkar | शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

मिटकरी ते विद्या चव्हाण, पडळकरांवर बरसले, राष्ट्रवादीची आंदोलनाची हाक

Gopichand Padalkar | मी, तटकरे, धनंजय बहुजनच, पडळकरांनी राज्यात फिरुन दाखवावं : जितेंद्र आव्हाड

शरद पवार हे राजकीय विरोधक, ते शत्रू नाहीत, पडळकरांच्या टीकेवर फडणवीसांचं भाष्य

संबंधित व्हिडीओ :

FIR against BJP MLA Gopichand Padalkar

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.