त्या विधानामुळे नितेश राणे यांच्या अडचणी वाढणार?; राणे भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा ठरताहेत?

भाजपचे नेते नितेश राणे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. रामगिरी महाराजांच्या समर्थनासाठी आयोजित करण्यात आलेल्या नगरच्या कार्यक्रमात नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नितेश राणे नेहमीच आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका घेत असतात. त्यामुळे आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणूनही त्यांची ओळख निर्माण होऊ लागली आहे.

त्या विधानामुळे नितेश राणे यांच्या अडचणी वाढणार?; राणे भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा ठरताहेत?
Nitesh Rane Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 10:27 PM

धार्मिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी भाजपचे नेते नितेश राणे यांच्याविरोधात श्रीरामपूर, ठाणे आणि भिवंडीसहीत अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आता त्यांच्याविरोधात दक्षिण नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाम्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पण याचबरोबर नितेश राणे आता भाजपमधील हिंदुत्वाचा नवा चेहरा म्हणूनही प्रस्थापित झालं आहे. सध्याच्या घडीला राज्यात नितेश राणे हेच आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेताना दिसत आहेत.

नितेश राणे यांच्या विरोधात नागपूरच्या गिट्टीखदान पोलिसांनी अॅक्शन घेतली आहे. राणेंच्या विरोधात दोन दिवसांपूर्वीच भारतीय न्याय संहितेच्या कलम 196, 299, 302, 352 आणि 353 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी 1 सप्टेंबर रोजी नगरमध्ये वादग्रस्त विधान केलं होतं. रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आयोजित एका कार्यक्रमात हे विधान केलं होतं. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातही इतर भागात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यभर दौरे, हिंदू संघटन

नितेश राणे हे भाजपचे हिंदुत्ववादी नेते म्हणून समोर येत आहेत. मुद्दा लव जिहाद चा असो लँड जिहाद चा असो किंवा व्होट जिहादचा असो. जिथं तिथं, जिथे तिथे हिंदूंचा आवाज दाबला जातो तिथे निलेश राणे जाऊन धडकतात. नितेश राणे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी गेले तरी तिथे हिंदुत्ववादी तरुणांचा गराडा, हिंदुत्ववादी संघटनांची गर्दी नितेश राणे यांच्या कार्यक्रमाला होताना दिसते आहे. कोणत्याही मोहल्यात, कोणत्याही गल्लीत हिंदूंवर अत्याचार झाला की नितेश राणे तिथं पोहोचलेले असतात. नितेश यांच्यामुळे हिंदूंची एकगठ्ठा मते भाजपच्याकडे अधिक वळताना दिसत आहे.

भाजपकडे आज जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस हा एकच चेहरा असा आहे जो राज्यभर मान्य आहे. राज्यातले सगळे आमदार, खासदार अगदी विरोधी पक्षातले नेते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचे राजकारणातले स्थान मान्य करतात. पण देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजपकडे आक्रमक चेहरा नाही. नितेश राणे ही उणीव भरून काढताना दिसत आहेत.

मराठा कार्ड

मनोज जरांगे पाटील तेव्हा देवेंद्र फडणवीसांवर विषारी टीका करत होते, तेव्हा नितेश राणे यांनी सर्वात आधी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. तोपर्यंत भाजपमधून कुणीही जरांगे यांना विरोध केला नव्हता. मराठा आरक्षणासाठी नारायण राणे समितीने केलेले काम हे मराठा समाजाला माहिती आहे. त्यामुळे जेव्हा राणे घराणे जरांगे पाटलांवर बोलले, त्यांना प्रत्युत्तर देऊ लागले तेव्हा जरांगे पाटलांची चांगलीच अडचण झाली होती. त्यामुळे आपसूकच नितेश राणे यांनी त्यांची उपयुक्तता भाजपमध्ये सिद्ध केलेली आहे. याशिवाय उद्धव ठाकरे संजय राऊत यांना एकहाती उत्तर देण्याचे काम नितेश राणे यांच्याकडून केले जाते.

हिंदुत्वाचा वारसा

जवळपास 40 वर्ष शिवसेनेत काढल्यामुळे राणे यांच्या हिंदुत्वावर कोणीच संशय घेऊ शकत नाही. त्यात नारायण राणे यांचे सुपुत्र असल्यामुळे नितेश यांची राजकारणाची जाण ही उत्तम आहे. कणकवली सारखा मतदारसंघ राणे यांनी दहा वर्ष सांभाळलेला आहे. मोदी लाटेतसुद्धा नितेश राणे हे काँग्रेसकडून कणकवलीत आमदार झाले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग सारखा किल्ल्यावर मजबूत पकड कोकणावर पाच पैकी तीन जिल्हे ताब्यात असा पोर्टफोलिओ असल्यामुळे नितेश राणे यांचे भाजपातलं वजन वाढत आहे,

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.