मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे वाटल्याची ऑडीओ क्लिप; शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिपचं सत्य?

आज पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच एक ऑडिओ क्लिप व्हयरल झाली आहे. या क्लिपबाबत शिंदे गटाकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे वाटल्याची ऑडीओ क्लिप; शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिपचं सत्य?
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 12:33 PM

औरंगाबाद : आज पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच एक ऑडिओ क्लिप व्हयरल झाली आहे. सभेला गर्दी जमावी यासाठी पैसे वाटल्याचं संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. या ऑडिओ क्लिपबाबत शिंदे गटाकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. ही ऑडिओ क्लिप बनावट आहे. कोणी तरी मुद्दाम बनवून ही क्लिप व्हायरल केल्याचं शिंदे गटाचे औरंगाबाद (Aurangabad) जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ (Rajendra Janjal) यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

राजेंद्र जंजाळ यांचा खुलासा

याबाबत बोलताना राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे की,  मुख्यमंत्र्यांच्या सभेबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र ही ऑडीओ क्लिप बनावट आहे. कोणतरी मुद्दाम बनवून ही क्लिप व्हायरल केली आहे. आम्ही या प्रकरणात सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधितांचे मोबाईल देखील चेक करावे अशी मागणीही यावेळी जंजाळ यांनी केली आहे.

यापूर्वी पत्र झालं होतं व्हायरल

दरम्यान यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सभेबाबत एक पत्र देखील व्हायरल झालं होतं. या पत्रात तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या पत्रावरून वाद निर्माण झाल्यानंतर शिंदे गटाकडू आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. हे पत्र बनावट असल्याचे राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले होते. या पत्रानंतर आता ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणात शिंदे गटाकडून सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती जंजाळ यांनी दिली .

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.