शिंदे सरकारमध्ये पहिली महिला मंत्री, राष्ट्रवादीच्या या महिला नेत्याने घेतली शपथ
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी फुटली असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत ( NCP ) मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह अनेक आमदार शिवसेना-भाजप ( Shivsena-BJP-NCP ) युतीत सहभागी झाले आहेत. अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी ( NCP MLA ) शपथ घेतली आहे. यासह शिंदे सरकारमध्ये पहिल्या महिला मंत्र्याचा समावेश झाला आहे. अदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे सरकारमध्ये पहिली महिला मंत्री
अदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे शिंदे सरकारमध्ये आता पहिल्या महिला मंत्र्याचा समावेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाले आहे.
शरद पवार यांना मोठा झटका
अजित पवार हे फुटल्यामुळे आता राष्ट्रवादी संकटात आहे. राष्ट्रवादीत २ गट झाले आहे. अजित पवार यांच्यासह अनेक आमदार आज शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. माझा या शपथविधीला पाठिंबा नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार आता काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार उपमुख्यमंत्री
अजितदादांच्या सोशल मिडीयावर उपमुख्यमंत्री असं पद अपडेट झालं आहे. ट्विटर, फेसबुकवर अजितदादांकडून उपमुख्यमंत्रीपदाचा उल्लेख करण्यात आला आहे. माजी विरोधी पक्षनेते असाही उल्लेख त्यामध्ये करण्यात आला आहे.
‘ऑपरेशन लोटस’
आजचा शपथ विधी हा ऑपरेशन लोटसचा भाग या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत पाठींबा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी पवार साहेबांसोबत आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
बारामतीमध्ये जल्लोष
बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु झाला आहे. अजितदादांच्या शपथविधीनंतर बारामती शहरात कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतो आहे. शहरातील भिगवण चौकात फटाके वाजवत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.