Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

संभाजी छत्रपती यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून संभाजी ब्रिगेडमध्ये सहभागी व्हावं... आम्ही संभाजी छत्रपती यांना मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडने संभाजी छत्रपती यांना दिलं आहे. | Sambhaji Brigade Chhatrapati Sambhaji

भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत
Sambhaji Chhatrapati
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 8:23 AM

औरंगाबाद : संभाजी छत्रपती (Sambhaji Chatrapati) यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून संभाजी ब्रिगेडमध्ये (Sambhaji Brigade) सहभागी व्हावं… आम्ही संभाजी छत्रपती यांना मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडने संभाजी छत्रपती यांना दिलं आहे. शुक्रवारी बीड इथे झालेल्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला असता ‘मला मुख्यमंत्री करा मग प्रश्न विचारा’ असं संभाजी छत्रपती म्हणाले होते. छत्रपतींच्या या वक्तव्याला संभाजी ब्रिगेडने प्रत्युत्तर दिलं आहे. (Firts Goodbye BJP, we are ready to make you CM Said Sambhaji Brigade Shivand Bhanuse To Chhatrapati Sambhaji )

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे काय म्हणाले?

“बीडच्या कार्यक्रमात आमच्या एका कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना संभाजी छत्रपती यांनी मला मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा, असं म्हटलं. मला त्यांना सांगायचंय, की तुम्ही पहिल्यांदा भाजपमधून बाहेर पडा आणि संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे (Shivanand Bhanuse) यांनी छत्रपती संभाजी यांना दिलं.

बीडच्या कार्यक्रमात संभाजी छत्रपती काय म्हणाले होते?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यंमंत्रीपदावर बसवा, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला. संभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनीही आपला रुद्रावतार दाखवला. त्यांनी उलट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा. मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असे संभाजीराजे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मात्र, यानिमित्ताने संभाजीराजे यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा ओठावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ऐका काय म्हणाले छत्रपती संभाजी?

(Firts Goodbye BJP, we are ready to make you CM Said Sambhaji Brigade Shivand Bhanuse To Chhatrapati Sambhaji)

हे ही वाचा :

VIDEO: मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रीपदावर बसवा: संभाजीराजे छत्रपती

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.