तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही, राहुल गांधींचे 5 मुद्दे
नवी दिल्ली : मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारने अवघ्या काही तासात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. याच मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मुद्दा क्रमांक – 1 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार-साडेचार वर्षात शेतकऱ्यांचं एक रुपयाचं कर्ज माफ केलं नाही, उलट त्यांनी 10-15 […]
नवी दिल्ली : मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारने अवघ्या काही तासात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. याच मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
मुद्दा क्रमांक – 1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार-साडेचार वर्षात शेतकऱ्यांचं एक रुपयाचं कर्ज माफ केलं नाही, उलट त्यांनी 10-15 उद्योगपतींचा अब्जावधींचं कर्ज माफ केलं – राहुल गांधी
मुद्दा क्रमांक – 2
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये 10 दिवसात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन आम्ही दिलं होतं, मात्र 6 तासात कर्ज माफ केलं – राहुल गांधी
मुद्दा क्रमांक – 3
राफेल करारात नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींच्या माध्यमातून चोरी केली. अनिल अंबानींवरील 45 हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं गेलं. एवढ्या रकमेत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा तिन्ही राज्यांमधील शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं असतं. मात्र, मोदींनी तो पैसा शेतकऱ्यांसाठी दिल नाही. – राहुल गांधी
मुद्दा क्रमांक – 4
शेतकऱ्यांना घाबरु नका, तुमच्या कर्जमाफीचं काम आम्ही करु. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारला भाग पाडू आणि जोपर्यंत कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत मोदींना झोपूही देणार नाही – राहुल गांधी
मुद्दा क्रमांक – 5
राफेल करार प्रकरणात आम्ही वारंवार संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी करत आहोत आणि हे सरकारला मान्य करावंच लागेल – राहुल गांधी