VIDEO | भास्कर जाधवांनी अरेरावी केलेली नाही, त्यांचा आवाज तसा, आमचे घरगुती संबंध, चिपळूणमधील ‘त्या’ महिलेची प्रतिक्रिया

या आरोपानंतर विरोधकांनी भास्कर जाधवांवर खरपूस टीका केली. यानंतर आता चिपळूणमधील (Chiplun) दमदाटीवर त्या महिलेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

VIDEO | भास्कर जाधवांनी अरेरावी केलेली नाही, त्यांचा आवाज तसा, आमचे घरगुती संबंध, चिपळूणमधील 'त्या' महिलेची प्रतिक्रिया
bhaskar jadhav flood vicitm women
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 1:45 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पावसाने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणमधील बाजारपेठेची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना नुकसान भरपाईची विनवणी करणाऱ्या एका महिलेला शिवसेना नेते भास्कर जाधव (Shiv Sena MLA Bhaskar Jadhav) दमदाटी केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर विरोधकांनी भास्कर जाधवांवर खरपूस टीका केली. यानंतर आता चिपळूणमधील (Chiplun) दमदाटीवर त्या महिलेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अरेरावी केलेली नाही. त्यांचा आवाज तसा आहे, असे ती महिला ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाली.

चिपळूणमधील त्या महिलेची पहिली प्रतिक्रिया

“गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे आणि आमचे घरगुती संबंध आहेत. त्यांनी माझ्या मुलाला वडीलकीच्या नात्याने सांगितलं. मी खूप भावूक झाले होते. आमच्याकडे मोबाईलला रेंज नाही, टीव्ही दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोललं जातं हे अद्याप माहिती नाही. त्यांचा आवाजच तसा आहे. त्यांनी अरेरावी केली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे ते हातवारे करत बोलत होते. त्यामुळे लोकांना गैरसमज झाला,” अशी प्रतिक्रिया चिपळूणमधील त्या महिलेने दिली आहे.

चिपळूणच्या बाजारपेठेत काल नेमकं काय घडलं? 

चिपळूणच्या बाजारपेठेत उद्धव ठाकरे एका एका दुकानासमोर जाऊन पीडित दुकानदारांशी संवाद साधत होते. त्याचवेळेस ते एका दुकानासमोर आले. तिथं एक महिला बराच वेळ आक्रोश करत होती. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेलं, त्यावेळेस पीडित महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या. मुख्यमंत्री त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. महिला आणि मुख्यमंत्री बोलणं सुरु होतं. पण भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत या महिलेला उत्तर दिलं. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला…बाकी काय… तुझा मुलगा कुठंय… अरे आईला समजव… आईला समजव… उद्या ये…, असं भास्कर जाधव तावातावाने बोलत होते.

(Flood victim woman in Chiplun first comment over ShivSena MLA Bhaskar Jadhav threatening)

संबंधित बातम्या :

भास्कर जाधवांच्या दमदाटीवर शिवसेनेतून पहिलं भाष्य, रोखठोक बोलणारे संजय राऊत म्हणतात….

भास्कर जाधवांना जनतेची अॅलर्जी? मुख्यमंत्र्यांसमोर पीडित महिलेच्या मुलाला म्हणाले, आईला समजव ! नेमकं काय घडलं?

VIDEO | चिपळूणमध्ये दुकानदारांसमोर उद्धव ठाकरेंनी हात जोडले, भास्कर जाधव म्हणाले, साहेब तुम्ही हात नका जोडू

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.