माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील निवडणुकीच्या रिंगणात
औरंगाबाद : माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून बी. जी. कोळसे पाटील हे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार असतील. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: औरंगाबादमधील सभेत कोळसे पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीतील […]
औरंगाबाद : माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून बी. जी. कोळसे पाटील हे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार असतील. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: औरंगाबादमधील सभेत कोळसे पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली.
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असेलल्या एमआयएमने मात्र विरोध केल्याचीही चर्चा आहे.
कोण आहेत बी. जी. कोळसे पाटील?
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी पुण्यातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि गुन्हेगारी कायदा यात विशेष अभ्यास केला. पुढे वकिली करत कायद्याच्या क्षेत्रात ते एक एक पाऊल पुढे टाकत गेले. 1990 साली मुंबई उच्च न्यायलयातून न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाले.
न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाल्यानंतर बी. जी कोळसे पाटील यांनी ‘लोकशासन आंदोलन’ अशी चळवळ सुरु केली आणि सामाजिक, पर्यावरण, मानवी हक्क इत्यादी विषयांसंबंधी आंदोलने, जनजागृती करण्यास सुरुवात केली. बी. जी. कोळसे पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे टीकाकार आणि विरोधक आहेत. आरएसएसच्या विचारसरणीला ते आपल्या मांडणीतून वैचारिक विरोध करत आले आहेत.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील आमदार कुणाचे आहेत?
- औरंगाबाद पूर्व – अतुल सावे – भाजप
- औरंगाबाद मध्य – इम्तियाज जलील – एमआयएम
- औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाठ – शिवसेना
- वैजापूर – भाऊसाहेब चिकटगावकर – राष्ट्रवादी
- गंगापूर – प्रशांत बंब – भाजप
- कन्नड – हर्षवर्धन जाधव – शिवसेना
औरंगाबाद लोकसभा : पाचव्या टर्मसाठी खैरेंवर मतविभाजनाची टांगती तलवार
निवडणुकीच्या तारखा जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.