Dhananjay munde | ‘धनंजय मुंडे घरात नर्तकीला…’, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गंभीर आरोप

Dhananjay munde | महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप झालाय. महत्त्वाच म्हणजे माजी मंत्री राहिलेल्या ज्येष्ठ महिला नेत्याने हा गंभीर आरोप केलाय. या संबंधी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलय. भाजपा विरोधातही मोर्चा उघडण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत.

Dhananjay munde | 'धनंजय मुंडे घरात नर्तकीला...', महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गंभीर आरोप
dhananjay mundeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 2:05 PM

निवृत्ती बाबर, मुंबई

मुंबई : काँग्रेस नेते वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी एक खळबळजनक पत्र लिहिलं आहे. वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. शालिनीताई पाटील हे नाव महाराष्ट्राला माहित आहे. आता माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात राजकीय आरोपांबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा एक मुद्दा आहे. शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्या 95 हजार कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात पत्र लिहिलय. अजित दादांना सरकारमध्ये घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी 70 हजार कोटींचा घोटाळा पचवला तसेच नरेंद्र मोदी यांनी 25 हजार कोटींचा घोटाळा देखील पचवला असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला.

“मी वारंवार याचा पाठपुरावा करत असताना देखील याकडे दुर्लक्ष केलं जातंय. मी उच्चस्तरीय वकील नेमून आता जोरदार लढाई लढणार आहे. भारतीय जनता पार्टीला भारतीय हे नाव वापरता येणार नाही, कारण तो त्यांचा अधिकार नाही, याविषयी देखील मी याचिका दाखल करून लढाई लढणार आहे त्यांचं जे जनसंघ नाव होत तेच त्यानी ठेवावं” असं शालिनीताई पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप

“आता मी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख नेत्यांना आज पत्र लिहिले, लवकरच देशातील सर्व नेत्यांना लिहिणार. राज्याच्या मंत्रिमंडळात घोटाळे आणि आरोपी असलेले मंत्री आहेत. छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदनाचा घोटाळ्याचा आरोप आहे तर धनंजय मुंडे यांच्यावर देखील अनेक आरोप आहेत” असं त्यांनी पत्रात म्हटलय. शालिनीताई पाटील यांनी पत्रात धनंजय मुंडे यांच्यावर एक अत्यंत गंभीर आरोप केलाय. “धनंजय मुंडे हे बाहेरून नर्तकी आणून 100 लोकांना जमवून घरात नर्तकीचे कार्यक्रम करतात” असा आरोप त्यांनी केलाय.

Non Stop LIVE Update
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती.
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले.
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'.
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर.
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन.
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल.
शरद पवारांच्या निवृत्तीवर अजितदादांचं मिश्कील भाष्य, 'मला तर मागचा...'
शरद पवारांच्या निवृत्तीवर अजितदादांचं मिश्कील भाष्य, 'मला तर मागचा...'.
खोत फडणवीसांचा कुत्रा तर राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी
खोत फडणवीसांचा कुत्रा तर राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी.
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार.
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'.