Gopal Shetty : भाजपा नेते गोपाळ शेट्टी उमेदवारी मागे घेणार का? देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर म्हणाले….

Gopal Shetty : पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे माजी आमदार, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बोरिवलीत भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे. हे बंड क्षमवण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भाजपाने आतापर्यंत सातवेळा गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे.

Gopal Shetty : भाजपा नेते गोपाळ शेट्टी उमेदवारी मागे घेणार का? देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर म्हणाले....
गोपाळ शेट्टी
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 12:23 PM

बोरिवली भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे माजी आमदार, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बोरिवलीतून भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. ‘मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे’ असं गोपाळ शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. “देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. मी वयाने व ते पदाने मोठे आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो” असं गोपाळ शेट्टी म्हणाले. “मी अनेकवेळा बोललो, वारंवार बोललो आहे. संघ परिवार, भाजपा कार्यकर्त्यांना पाऊल पुढे टाकण्याची शिकवण दिलेली आहे. समाजहितासाठी मी हे करतोय” असं गोपाळ शेट्टी म्हणाले.

“पहिल्या दिवसापसून मी पक्ष सोडलेला नाही. पक्षाला काढावं लागतं. असा प्रसंग आल्यानंतर पक्षाला त्यांचं काम करावं लागतं. पक्षाने काढलं, तरी मी पक्ष सोडणार नाही. मी आजही ठाम आहे. मी जे काम करतोय ते पक्षहितासाठी आहे” असं गोपाळ शेट्टी म्हणाले. “अशा प्रसंगात पक्षाला पक्षाच काम करावं लागतं. नाहीतर शिस्त राहणार नाही. मी पक्ष सोडलेला नाही. अन्य पक्षात जाणार नाही. भाजपाची धेय्य-धोरणं वेगळी आहेत. पक्षात काही लोकं असे आहते, त्यांच्यामुळे पक्षाची हानी होतोय. माझी लढाई त्यांच्याविरोधात आहे” असं गोपाळ शेट्टी म्हणाले. “मी पक्ष हितासाठी जे करायचं ते करणार. माझं पाऊल पुढे पडलं, तर ते पक्ष हितासाठी असेल” असं गोपाळ शेट्टी म्हणाले.

सातवेळा उमेदवारी देऊनही गोपाळ शेट्टी का लढतायत?

बोरिवलीमध्ये कमळ विरुद्ध गोपाळ शेट्टी असा सामना दिसेल का? त्यावर त्यांनी “माझ्या ह्द्यात कमळ आहे. डोक्यात कमळ आहे, ते कोणी काढू शकत नाही” असं उत्तर दिलं. गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु आहेत. काल भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी गोपाळ शेट्टींची भेट घेतली. पण त्यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी नकार दिला. भाजपाने मला न्याय दिला. पण आतापर्यंत चारवेळा बोरिवलीत बाहेरचा उमेदवार दिलाय. त्यामुळे बोरिवलीकरांच्या आत्मसन्मानासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलोय असं गोपाळ शेट्टी यांनी सांगितलं.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.