माजी खासदार राजू शेट्टी उपचारासाठी पुण्यात, कोरोना संसर्गानंतर तब्येतीची तक्रार

राजू शेट्टी यांच्यावर सुरुवातीला कोल्हापूरमध्ये घरीच उपचार करण्यात आले, मात्र त्रास वाढल्याने त्यांना पुण्याला नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

माजी खासदार राजू शेट्टी उपचारासाठी पुण्यात, कोरोना संसर्गानंतर तब्येतीची तक्रार
Follow us
| Updated on: Sep 10, 2020 | 8:03 AM

इचलकरंजी : कोल्हापूरचे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना उपचारासाठी पुण्याला नेण्यात आले आहे. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे राजू शेट्टी यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजू शेट्टी यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. (Former MP Raju Shetti shifted to Pune for treatment after testing COVID Positive)

राजू शेट्टी यांचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी (8 सप्टेंबर) पॉझिटिव्ह आला होता. सुरुवातीला त्यांच्यावर कोल्हापूरमध्ये घरीच उपचार करण्यात आले, मात्र त्रास वाढल्याने त्यांना पुण्याला नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

राजू शेट्टी यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेट्टी यांना काल अ‍ॅम्ब्युलन्सने पुण्याला नेण्यात आले.

शेट्टी यांच्यासह पत्नी आणि सुपुत्र सौरभही कोरोना पॉझिटीव्ह आल्याने सर्व घरीच क्वारंटाईन झाले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरुवातीला त्यांच्यावर घरी उपचार सुरु होते. राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याविषयी माहिती देत संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही राजू शेट्टी यांची कोरोना चाचणी झाली होती, मात्र तेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, परंतु एचआरसीटी टेस्टमधून त्यांच्या फुफ्फुसाला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे कुटुंबातील सर्वांची चाचणी करण्यात आली होती.

सातत्याने सोबत असलेले राजू शेट्टी यांचे सुपुत्र सौरभ शेट्टी यांचा कोरोना चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला होता, तर इतर सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले. त्यानंतर खबरदारी म्हणून राजू शेट्टी यांनी घरात आयसोलेट राहणे पसंत केले होते.

राजू शेट्टी गेल्या काही दिवसांपासून दूध दर आंदोलन करताना दिसत आहेत. शेट्टी यांच्या नेतृत्वात 27 ऑगस्टला बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

बारामतीत जाऊन राजू शेट्टी म्हणाले, “आता आक्रमक व्हा, मंत्री आला की दुधाने आंघोळ घाला”

(Former MP Raju Shetti shifted to Pune for treatment after testing COVID Positive)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.