Kagal Constituency : कोल्हापुरात मंडलिक कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर महायुतीसाठी धोक्याची घंटा

Kagal Constituency : माजी खासदार संजय मंडलिक यांच्या कुटुंबातील मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे महायुती समोरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. मागच्या काही दिवसांपासून कागल विधानसभा मतदारसंघ सतत चर्चेत आहे.

Kagal Constituency : कोल्हापुरात मंडलिक कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर महायुतीसाठी धोक्याची घंटा
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 11:43 AM

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एका मतदारसंघाची खूप चर्चा सुरु आहे, तो म्हणजे कागल. कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघातून सध्या हसन मुश्रीफ आमदार आहेत. हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. महायुतीकडून उमेदवारी त्यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित आहे. पण कागलची लढाई हसन मुश्रीफ यांच्यासाठी सोपी नसेल. तिकीटाची शक्यता मावळल्याने समरजीत घाटगे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली. समरजीत मागच्या काही वर्षांपासून या मतदारसंघात विधानसभेची तयारी करत आहेत. हसन मुश्रीफ यांच्यासमोर त्यांचे आव्हान आहेच. पण आता संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक सुद्धा हसन मुश्रीफ यांच्या विरोधात जाण्याच्या तयारीत आहेत.

संजय मंडलिक हे शिवसेना शिंदे गटात आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांचा पराभव झाला होता. आता कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघातून वीरेंद्र मंडलिक यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महायुतीसमोरच्या अडचणी वाढू शकतो. या निमित्ताने मंडलिक कुटुंबातील मतभेद सुद्धा समोर आले आहेत.

संजय मंडलिक यांचं म्हणणं काय?

कागल विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरूनच मंडलिक पिता-पुत्रांमध्येच वेगवेगळी मत आहेत. एकाबाजूला वीरेंद्र मंडलिक हे निवडणूक लढवण्याची तयारी करतायत. दुसऱ्याबाजूला माजी खासदार संजय मंडलिक मात्र हसन मुश्रीफ यांच्या व्यासपीठावर दिसले. “राज्यात पुन्हा महायुतीचा शासन यावं आणि त्यात हसन मुश्रीफ असावेत. त्यासाठी अत्यंत ताकदीने हसन मुश्रीफ यांना मदत करा” मौजे सांगाव येथील जाहीर सभेत संजय मंडलिक यांनी हे वक्तव्य केलं. संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी महायुतीकडून उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे मदत केली नव्हती असाही वीरेंद्र मंडलिक यांनी आरोप केला होता.

पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी; हवाई दलाच्या विमानांची भरारी
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी; हवाई दलाच्या विमानांची भरारी.
'...पण माझं वय कसं कॉपी करणार?', रोहित पवारांचा कोणाला टोला?
'...पण माझं वय कसं कॉपी करणार?', रोहित पवारांचा कोणाला टोला?.
पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे
पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे.
निवडणुकीआधीच सरकारचा मास्टरस्ट्रोक, कॅबिनेटमध्ये ८० निर्णयांचा धडाका
निवडणुकीआधीच सरकारचा मास्टरस्ट्रोक, कॅबिनेटमध्ये ८० निर्णयांचा धडाका.
अनमोल 'रत्न' हरपला... सामान्य लोकं हळहळतील असा शेवटचा उद्योगपती गेला
अनमोल 'रत्न' हरपला... सामान्य लोकं हळहळतील असा शेवटचा उद्योगपती गेला.
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा.
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन.
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी.