Kishori Pednekar | शिंदे शब्द पाळणारे…. किशोरी पेडणेकरांकडून मुख्यमंत्र्यांची स्तुती?
एरवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आगपाखड करणाऱ्या किशोरी पेडणेकरांनी आजच्या प्रतिक्रियेत चक्क शिंदेंची स्तुती केली.
मुंबईः मुंबई महापालिका निवडणुकांत(Mumbai Election) भाजपविरुद्ध शिवसेना असा थेट सामना होणार असल्याचं स्पष्ट आहे. त्यातच मागील निवडणुकीत शिवसेनेसोबत असलेले एकनाथ शिंदे यावेळी भाजपसोबत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात (CM Eknath Shinde) शिवसेनेच्या नेत्यांची तीव्र नाराजी आहे. मात्र मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्तुती केली आहे. एकनाथ शिंदे यांचा मी बऱ्याचदा अनुभव घेतलाय. आम्ही मानतो, तुम्ही शब्द पाळणारे आमचे कट्टर शिवसैनिक आहात, असं त्या म्हणाल्या. पण आता मात्र तुम्ही शब्द फिरवणारे झाले आहात, अशी खंतही त्यांनी पुढच्या वाक्यात व्यक्त केली.
236 आणि 227करणारेही तुम्हीच!
महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास खातं एकनाथ शिंदेंकडे होतं. त्यावेळी नवीन वॉर्ड रचनेनुसार, वॉर्डांची संख्या शिंदेंनीच 236 केली. आणि आता भाजपसोबत मांडीला मांडी लावून तुम्हीच वॉर्डांची संख्या पुन्हा 227 केली, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केली.
शब्द पाळणारे कट्टर शिवसैनिक असले तरीही आता मात्र तुम्ही शब्द फिरवल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.
सदा सरवणकरांबद्दल काय?
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या मुलाने गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात येतोय. शिंदे गटाचे अनेक आमदार कुणी हातपाय तोडण्याची… तर कुणी तंगडं तोडण्याची भाषा करतायत, त्याविरोधात आम्ही पोलिसांना भेटणार असल्याचं किशोरी पेडणकर यांनी सांगितलं. पोलिसांनी त्यांची कार्यपद्धती राबवावी, असं निवेदन आम्ही देणार आहोत, असं पेडणकर म्हणाल्या…
नुसतं 52 असून चालत नाही…
आगामी निवडणुकीत शिवसेना उरणार नाही, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. यावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर यांनी, ‘ कुणीही 52 असलं म्हणून काही चालत नाही, मात्र (डोक्याकडे हात दाखवत) याच्यात असावं लागतं.. असा टोमणा लगावला…
आम्ही घरंदाज…
नवनीत राणांवर टीका करताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ज्या मुलीनी १३ व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमधून प्रसिद्धी केलीय. तिच्यावर आम्ही घरंदाज बायका त्यावर बोलणार नाहीत.