Vasant More : वसंत मोरे वंचित सोडणार का? मुंबईत आज ‘या’ नेत्याची घेणार भेट

Vasant More : वसंत मोरे आता भविष्याच्या दृष्टीने लवकरच एका नवीन राजकीय पक्षात प्रवेश करु शकतात. वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे प्रमुख नेते होते. वसंत मोरे आज मुंबईत एका मोठ्या नेत्याची भेट घेणार आहेत. नवीन पक्षात प्रवेश या दृष्टीने त्यांच्या या भेटीकडे पाहिलं जातय.

Vasant More : वसंत मोरे वंचित सोडणार का? मुंबईत आज 'या' नेत्याची घेणार भेट
वसंत मोरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 10:22 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करणारे पुण्याचे वसंत मोरे लवकरच एक नवीन पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यांनी पुण्यातून वंचितकडून तिकीट घेऊन लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यांचा दारुण पराभव झाला. आता भविष्याच्या दृष्टीने ते लवकरच एका नवीन राजकीय पक्षात प्रवेश करु शकतात. वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे प्रमुख नेते होते. पण पुण्यातील मनसेच्या अन्य पदाधिकाऱ्यांबरोबरच्या मतभेदांमुळे काही महिन्यांपूर्वी त्यांनी मनसे सोडली.

मनसे सोडल्यानंतर ते महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी शरद पवार, संजय राऊत यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. पण मविआने पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे अखेर त्यांनी प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन तिकीट मिळवलं. पण त्यांना लोकसभा निवडणुकीत छाप उमटवणारी कामगिरी करता आली नाही. आता वसंत मोरे लवकरच नवीन पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

भेटीमागे हेतू काय?

वसंत मोरे आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याच बोलल जातय. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यामागे पुण्यातून विधानसभेच तिकीट मिळवण्याची वसंत मोरेंची रणनिती असू शकते.

Non Stop LIVE Update
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील.
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.