Suresh Mhatre | शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस, पाचव्यांदा पक्षांतर, बाळ्या मामा म्हात्रे आता राष्ट्रवादीत

2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीमध्ये लढत असताना भाजप उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध केल्याने त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आले होते. नंतर निलंबन मागे घेण्यात आले होते.

Suresh Mhatre | शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस, पाचव्यांदा पक्षांतर, बाळ्या मामा म्हात्रे आता राष्ट्रवादीत
सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 2:07 PM

सुनील घरत, शहापूर : ठाण्यातील दिग्गज नेते सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे (Suresh Balya Mama Mhatre) यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बाळ्या मामांनी राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले. अवघ्या साडेचार महिन्यांपूर्वी म्हात्रेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस नंतर आता राष्ट्रवादी असा सुरेश म्हात्रेंचा राजकीय प्रवास आहे.

ठाणे जिल्हा परिषद बांधकाम आणि आरोग्य समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे यांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमात पक्षप्रवेश केला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीमध्ये लढत असताना भाजप उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध केल्याने त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आले होते. नंतर निलंबन मागे घेण्यात आले होते.

कोण आहेत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा?

सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे बाळ्या मामा नावाने प्रसिद्ध शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख म्हणूनही काम केलं होतं ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते, तर बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती 2014 मध्ये सुरेश म्हात्रेंनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती पराभवानंतर आधी भाजप, नंतर पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला होता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेत कपिल पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे शिवसेनेतून निलंबित करण्यात आले, नंतर निलंबन मागे घेण्यात आले.

संबंधित बातम्या:

शिवसेनेचे दोन बडे नेते काँग्रेसमध्ये, अशोक शिंदेंसह बाळ्या मामा म्हात्रेंचेही पक्षांतर

काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट, उंट, घोड्यासारखी नाही, विलासरावांचा व्हिडीओ ट्विट करत अशोक चव्हाणांचा ममतादीदींवर वार

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.