17 जागांसाठी अंदाजे 57 टक्के मतदान, कल्याणमध्ये सर्वात कमी नोंद

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2019) चौथ्या टप्प्यासाठी आज राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती.  नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या 17 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान झालं. या […]

17 जागांसाठी अंदाजे 57 टक्के मतदान, कल्याणमध्ये सर्वात कमी नोंद
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:06 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2019) चौथ्या टप्प्यासाठी आज राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती.  नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या 17 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान झालं. या टप्प्यात एकूण 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदारांचा समावेश होता. 17 मतदारसंघामध्ये एकूण 57 टक्के मतदान झालं.

मतदानासाठी मुंबईत नेते अभिनेत्यांसह सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. उद्योगपती अनिल अंबानी अभिनेते शाहरुख, बच्चन कुटुंबीय, गीतकार गुलजार, रणबीर, करिना, रणवीर सिंह, ऋतिक रोशन, सलमान, प्रियंका, मुकेश अंबानी, नरेश गोयल यासारख्या दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला.  दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नात रेवती, जावई सदानंद सुळे यांच्यासह सकाळी मतदान केलं. त्यानंतर तातडीने पवार दुष्काळ दौऱ्यावर रवाना झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दोन तास रांगेत उभं राहून मतदान केलं. तर उद्धव ठाकरे हे सुद्धा सहकुटुंब मतदानासाठी पोहोचले.

6 वाजेपर्यंत अंदाजित मतदान

नंदुरबार – 67.64%

धुळे – 57.29%

दिंडोरी – 64.24%

नाशिक – 55.41%

पालघर – 64.09%

भिवंडी – 53.68%

कल्याण – 44.27%

ठाणे – 49.95%

मुंबई उत्तर – 59.32%

उत्तर पश्चिम मुंबई – 54.71%

उत्तर पूर्व मुंबई – 56. 31%

उत्तर मध्य मुंबई – 52.84%

दक्षिण मध्य मुंबई – 55.35%

दक्षिण मुंबई – 52.15%

मावळ – 59.12%

शिरूर – 59.55%

शिर्डी – 60.45%

एकूण – 57%

LIVE UPDATE :

[svt-event title=”मुंबईने पुण्याचा विक्रम मोडला” date=”29/04/2019,6:47PM” class=”svt-cd-green” ] मुंबईने पुण्याचा 49 टक्के मतदानाचा तुटपुंजा विक्रम मोडला, संध्या. 5 पर्यंत दक्षिण मुंबई वगळता सर्व मतदारसंघातील मतदान 50 टक्क्यांवर [/svt-event]

[svt-event title=”5 पर्यंत सरासरी 52% मतदान” date=”29/04/2019,6:04PM” class=”svt-cd-green” ] 5 पर्यंत सरासरी 52% मतदान ?नंदुरबार-62% ?धुळे-51% ?दिंडोरी-58% ?नाशिक-53% ?पालघर-58% ?भिवंडी-49% ?कल्याण-42% ?ठाणे-46% ?उत्तर मुंबई-55% ?उ. पश्चिम मुंबई-50% ?ईशान्य मुंबई-52% ?उ. मध्य मुंबई-50% ?द. मध्य मुंबई-52% ?द. मुंबई-48% ?मावळ-53% ?शिरुर-52% ?शिर्डी-56% [/svt-event]

[svt-event title=”दुपारी 3 पर्यंत 42% मतदान” date=”29/04/2019,3:53PM” class=”svt-cd-green” ] ?नंदुरबार-52% ?धुळे-41% ?दिंडोरी-46% ?नाशिक-42% ?पालघर-47% ?भिवंडी-39% ?कल्याण-34% ?ठाणे-39% ?उत्तर मुंबई-45% ?उ. पश्चिम मुंबई-41% ?ईशान्य मुंबई-43% ?उ. मध्य मुंबई-40% ?द. मध्य मुंबई-41% ?द. मुंबई-39% ?मावळ-42% ?शिरुर-41% ?शिर्डी-45% [/svt-event]

[svt-event title=”अभिनेता रणवीर सिंगने मुंबईत मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,2:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दुपारी 1 पर्यंत 32 % मतदान” date=”29/04/2019,2:06PM” class=”svt-cd-green” ] दुपारी 1 पर्यंत 32 % मतदान ?नंदुरबार-40% ?धुळे-31% ?दिंडोरी-36% ?नाशिक-31% ?पालघर-36% ?भिवंडी-30% ?कल्याण-25% ?ठाणे-30% ?उत्तर मुंबई-33% ?उ. पश्चिम मुंबई-30% ?ईशान्य मुंबई-32% ?उ. मध्य मुंबई-29% ?द. मध्य मुंबई-30% ?द. मुंबई-28% ?मावळ-32% ?शिरुर-32% ?शिर्डी-35% [/svt-event]

[svt-event title=”सचिन तेंडुलकरने सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,1:57PM” class=”svt-cd-green” ] मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली, मुलगा अर्जुन, मुलगी सारा यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. मुंबईतील पाली हिल येथील मतदान केंद्रावर तेंडुलकर कुटुंबाने मतदान केलं. [/svt-event]

[svt-event title=”सलमान खानने मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,1:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरेंनी मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,1:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिग बींचं मतदान” date=”29/04/2019,1:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,12:42PM” class=”svt-cd-green” ] जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी मतदानाचा हक्क बजावला. मुंबईत दोघांनीही मतदान केलं. [/svt-event]

[svt-event title=”VIDEO : गीतकार गुलजार यांच्याशी बातचीत” date=”29/04/2019,12:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे यांचं मतदान” date=”29/04/2019,12:25PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचं कुटुंब उपस्थित होते. तसेच पूनम महाजन याही उपस्थित होत्या. [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे, उद्धव ठाकरे मतदान करण्यासाठी पोहोचले” date=”29/04/2019,12:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चौथ्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान” date=”29/04/2019,11:59AM” class=”svt-cd-green” ] चौथ्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान ?नंदुरबार – 25 % ?धुळे – 18 % ?दिंडोरी – 21 % ?नाशिक – 17 % ?पालघर – 21 % ?भिवंडी – 17 % ?कल्याण – 14 % ?ठाणे – 17 % ?उत्तर मुंबई – 19 % ?उत्तर पश्चिम मुंबई – 18 % ?ईशान्य मुंबई – 18 % ?उत्तर मध्य मुंबई- 16 % ?दक्षिण मध्य मुंबई- 17 % ?दक्षिण मुंबई – 16 % ?मावळ – 18 % ?शिरुर – 19 % ?शिर्डी – 21 % ?एकूण सरासरी – 18 % [/svt-event]

[svt-event title=”VIDEO: पवईतील मतदारांची रांग पाहा थक्क व्हाल, गाडीतून रांगेचा शूट केलेला व्हिडीओ” date=”29/04/2019,11:27AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO अभिनेते आदेश बांदेकर आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांचं रांगेत उभे राहून मतदान” date=”29/04/2019,11:15AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गुलजार यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,11:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO: अभिनेत्री सोनाली बेंद्रेने मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,10:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चांगल्या दिवसांसाठी आम्हाला मत द्या – पार्थ पवार” date=”29/04/2019,10:44AM” class=”svt-cd-green” ] मतदान चांगले होत आहे, वातावरण चांगले आहे, चांगले दिवस आणायाचे असतील तर आम्हाला निवडून द्या – पार्थ पवार [/svt-event]

[svt-event title=”संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचं धुळ्यात मतदान” date=”29/04/2019,10:39AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”IPS विश्वास नांगरे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,10:34AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अभिनेत्री माधुरी दीक्षितने मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,10:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO: अभिनेता सुमित राघवननं आपल्या मुलीसह पार्लेटीळक विद्यालयात मतदान केलं ” date=”29/04/2019,10:27AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एकनाथ शिंदेंचं मतदान” date=”29/04/2019,10:23AM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला, यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह कुटुंबीयही होते [/svt-event]

[svt-event title=”VIDEO: कांदिवली पश्चिमेकडील कपोल हायस्कूलमध्ये मतदानासाठी भलीमोठी रांग ” date=”29/04/2019,10:16AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अभिनेता आमिर खानने पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,10:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”येवला तालुक्यातील लौकीतील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार” date=”29/04/2019,10:01AM” class=”svt-cd-green” ] दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील येवला तालुक्यातील लौकीतील ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार , येवला तालुक्यातील शिरसगाव, लौकी, वळदगाव, तीन गावची ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन व्हावे यासाठी लौकी गावातील ग्रामस्थानी मतदानावर बहिष्काराचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”हितेंद्र ठाकूर यांचे सहकुटुंब मतदान” date=”29/04/2019,9:56AM” class=”svt-cd-green” ] बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर, त्यांच्या पत्नी माजी महापौर प्रविणा ठाकूर, मुलगा आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांनी सकाळी 9 वाजता मतदान केले आहे. विरार पश्चिम येथील नूतन हिंदी विद्यालयात सर्वांनी मतदान केले आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी घराबाहेर पडून शांततेत मतदान करावे असे अहवानही हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे. [/svt-event]

[svt-event title=”VIDEO: अभिनेत्री किशोरी शहाणेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला ” date=”29/04/2019,9:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान” date=”29/04/2019,9:46AM” class=”svt-cd-green” ] चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान ?नंदुरबार – 9 % ?धुळे – 6 % ?दिंडोरी – 7 % ?नाशिक – 7 % ?पालघर – 8 % ?भिवंडी – 6 % ?कल्याण – 5 % ?ठाणे – 7 % ?उत्तर मुंबई – 8 % ?उत्तर पश्चिममुंबई – 7 % ?ईशान्य मुंबई – 7 % ?उत्तर मध्य मुंबई- 6 % ?दक्षिण मध्य मुंबई- 6 % ?दक्षिण मुंबई – 7 % ?मावळ – 7 % ?शिरुर – 7 % ?शिर्डी – 7 % ?एकूण सरासरी – 7 % [/svt-event]

[svt-event title=”शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,9:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान” date=”29/04/2019,9:37AM” class=”svt-cd-green” ] चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान – ?दक्षिण मध्य मुंबई – 6.77 टक्के ?दक्षिण मुंबई – 5.55 टक्के ?शिर्डी – 7.29 टक्के ?नाशिक – 10 टक्के [/svt-event]

[svt-event title=”संगीतकार शंकर महादेवन यांचे पत्नीसह मुंबईत मतदान” date=”29/04/2019,9:18AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सुरेश टावरेंची तक्रार” date=”29/04/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ] भिवंडीत काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याची काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांच्याकडून तक्रार [/svt-event]

[svt-event title=”बेगूसरायमध्ये कन्हैया कुमारचं मतदान” date=”29/04/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ] सीपीआयचा बेगूसरायमधील उमेदवार कन्हैया कुमार याने मतदानाचा हक्क बजावला [/svt-event]

[svt-event title=”VIDEO : मतदानानंतर उर्मिला मातोंडकर यांची प्रतिक्रिया” date=”29/04/2019,8:57AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बविआचे उमेदवार बळीराम जाधवांचं मतदान” date=”29/04/2019,8:50AM” class=”svt-cd-green” ] पालघर : बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बाजीराम जाधव यांनी आज सकाळी 7 वाजता मतदान केले. वसई ताल्युक्यातील सायावन या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.. [/svt-event]

[svt-event title=” भाजप नेते विनोद तावडे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,8:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,8:44AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अभिनेत्री प्रियांका चोप्राचं मतदान” date=”29/04/2019,8:31AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दक्षिण मध्य मुंबईत मतदानाचा उत्साह” date=”29/04/2019,8:29AM” class=”svt-cd-green” ] दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदान उस्फूर्तपणे होतं आहे. मतदानात हक्क बजावताना ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवावर्ग हे आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावत असल्याची भावना व्यक्त करत आहेत. आम्ही मतदान केलं, तुम्हीही मतदान करा, अशी जनजागृतीही मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हे मतदारराजा करत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”चित्रा वाघ यांचं सहकुटुंब मतदान” date=”29/04/2019,8:16AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मतदानचा हक्क बजावला [/svt-event]

[svt-event title=”शेलारांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,8:12AM” class=”svt-cd-green” ] मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी वांद्रे येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बाजवला. [/svt-event]

[svt-event title=”परेश रावल यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,8:08AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत माजी खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी मतदानाचा हक्क बजावला [/svt-event]

[svt-event title=”आमदार पराग अळवणींचं मतदान” date=”29/04/2019,8:02AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील मुंबई पब्लिक या शाळेत भाजपचे स्थानिक आमदार पराग अळवणी त्यांच्या पत्नी नगरसेविका ज्योती अळवणी यांनी मतदानाचा हक्क बजावला [/svt-event]

[svt-event title=”आशिष शेलारांचं मतदान” date=”29/04/2019,8:00AM” class=”svt-cd-green” ] मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतील बांद्रा येथे सेंट स्टेनिस्लॉस शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केलं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपच्या यशाबद्दल आपल्याला खात्री असल्याचे सांगितले. [/svt-event]

[svt-event title=”ईशान्य मुंबईतील ईव्हीएम पुन्हा सुरु” date=”29/04/2019,7:47AM” class=”svt-cd-green” ] ईशान्य मुंबईतील भांडुप व्हिलेज मनपा मराठी शाळेतील मतदान केंद्रावरील ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड, दोन्ही बूथवर मतदान सुरु [/svt-event]

[svt-event title=”आरबीआय गव्हर्नर मतदानासाठी पोहोचले” date=”29/04/2019,7:37AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील पेडर रोडमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास मतदान करण्यासाठी पोहोचले [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड” date=”29/04/2019,7:34AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील विहितगाव मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड, मतदानाला अद्याप सुरुवात नाही, ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदारांचा खोळंबा [/svt-event]

[svt-event title=”ईशान्य मुंबईत मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाड” date=”29/04/2019,7:30AM” class=”svt-cd-green” ] ईशान्य मुंबईतील भांडुप व्हिलेज महापालिका मराठी शाळेतील मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड, दोन बूथवर अजून मतदान सुरु नाही, मतदारांची रांग वाढली [/svt-event]

[svt-event title=”डॉ. अमोल कोल्हेंनी मतदानाचा हक्क बजावला” date=”29/04/2019,7:28AM” class=”svt-cd-green” ] विकासाचे मुद्दे मांडले आहेत, त्यामुळे जिंकण्याची खात्री आहे – डॉ. अमोल कोल्हे, शिरुरमध्ये डॉ. अमोल कोल्हेंनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला [/svt-event]

[svt-event title=”पूनम महाजन जिंकेल – राहुल महाजन” date=”29/04/2019,7:23AM” class=”svt-cd-green” ] उत्तर मध्य मुंबईत काँटे की टक्कर नाही, पूनम महाजनने खूप काम केलंय, यावेळ जास्त मतदान होईल – राहुल महाजन [/svt-event]

[svt-event title=”अनिल अंबानींचं मतदान” date=”29/04/2019,7:20AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत उद्योगपती अनिल अंबानींनी मतदानाचा हक्क बजावला [/svt-event]

[svt-event title=”मतदान पत्रिकेत गडबड असल्याने 85 वर्षीय जेष्ठ नागरिक माघारी” date=”29/04/2019,7:16AM” class=”svt-cd-green” ] उत्तर मध्य मुंबईत बांद्रा येथील सेंट स्टेनिसलॉसस शाळेतील मतदान केंद्रावर मतदान पत्रिकेत गडबड असल्याने 85 वर्षीय जेष्ठ नागरिकास मतदान न करता परत जावे लागले. [/svt-event]

[svt-event title=”थोड्याच वेळात डॉ. अमोल कोल्हे पत्नीसह मतदान करणार” date=”29/04/2019,7:14AM” class=”svt-cd-green” ] शिरुर : राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि पत्नी अश्विनी कोल्हे मतदान केंद्रावर पोहोचले, थोड्याच वेळात मतदान करणार [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात पहिल्या मतदारांचे जंगी स्वागत” date=”29/04/2019,7:08AM” class=”svt-cd-green” ] ठाण्यात मतदानाला सुरुवात, मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी, मतदान केंद्रावर आकर्षक सजावट करुन, पहिल्या मतदारांचं ढोल-ताशे वाजवत सनईच्या सुरात स्वागत [/svt-event]

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.