विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्या, सोमवारी 288 जागांसाठी मतदान

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा आज (19 ऑक्टोबर) संध्याकाळी थंडावल्या. दरम्यान आता मतदार काय कौल देतात, हे येत्या 24 ऑक्टोबर रोजी स्पष्ट (Assembly Election 2019 Campaign End) होईल.

विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्या, सोमवारी 288 जागांसाठी मतदान
Follow us
| Updated on: Oct 19, 2019 | 8:44 PM

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा आज (19 ऑक्टोबर) संध्याकाळी थंडावल्या. येत्या 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील 288 जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आता मतदार काय कौल देतात, हे येत्या 24 ऑक्टोबर रोजी स्पष्ट (Assembly Election 2019 Campaign End) होईल.

विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच अनेक ठिकाणी सभांचा धुराळा उडाला होता. त्यात सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांचाही समावेश होता. सत्ताधारी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची रणधुमाळी पाहायला मिळाली.

तर दुसरीकडे विरोधी पक्षातील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी दिवस-रात्र मेहनत करुन प्रचार केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आदींनीही आपल्या प्रचार भाषणांतून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या गेल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ठिकठिकाणच्या उमेदवारांसाठी सभांचा झंझावात पाहायला मिळाला आहे. यावेळी त्यांनी सत्तेसाठी नव्हे तर, प्रबळ विरोधी पक्षनेत्यासाठी मतदान करा असा वेगळाच पॅटर्न त्यांनी (Assembly Election 2019 Campaign End) अवलंबला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी येत्या सोमवारी 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे. तर गुरुवारी 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.