Shashikant Shinde : साताऱ्यात पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया काय?

साताऱ्याच सस्पेन्स अखेर संपला आहे. साताऱ्यातून शशिकांत शिंदे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. शरद पवार गटाने शशिकांत शिंदे यांचं नाव जाहीर केलय. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतली. शशिकांत शिंदे यांचा सामना उदयनराजे भोसले यांच्याशी होऊ शकतो. महायुतीने अजून त्यांना उमेदवारी जाहीर केलेली नाही.

Shashikant Shinde : साताऱ्यात पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया काय?
Shashikant Shinde
Follow us
| Updated on: Apr 10, 2024 | 9:58 AM

साताऱ्यातून शरद पवार गटाने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. साताऱ्यातून शरद पवार कोणाला उमेदवारी देणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतली. त्यानंतर उमेदवार कोण? अशी चर्चा सुरु झालेली. बारामतीप्रमाणे साताऱ्याचा कौल काय? याकडेही राज्याच लक्ष आहे. साताऱ्यात शशिकांत शिंदे यांचा सामना उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध होऊ शकतो. अजून महायुतीने साताऱ्यातून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“मी पवारसाहेब आणि साताऱ्यातील जनतेचे आभार मानतो. हा चव्हाण साहेबांच्या, पवार साहेबांच्या विचारांना मानणारा जिल्हा आहे. पक्षाच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या पाठिशी उभा राहिला आहे. माझी कोणाशी लढाई नाही” असं शशिकांत शिंदे म्हणाले. “या जिल्ह्यात शेतकरी, जनतेला अपेक्षित नेतृत्व उभ करण्याचा प्रयत्न करेन. या जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. त्यांना आवाज उठवणारा नेता पाहिजे. काही लोकांचा आदर्श ठेवून काम करेन. चारवेळा आमदार, मंत्री झालो. कोरेगाव, जावळीच्या मतदारांनी पाठबळ दिलं” असं शशिकांत शिंदे म्हणाले.

काय म्हणाले शशिकांत शिंदे ?

“साहेबांनी जी लढायची भूमिका घेतली, काही झालं, तरी जो निर्णय घ्याल तो मान्य असेल” असं साहेबांना सांगितलेलं. “साताऱ्याचा आदर्श खासदार होण्याचा प्रयत्न करेन. जनतेमध्ये सुप्त इच्छाशक्ती आहे. शेतकरी वर्ग नाराज आहे” असं ते म्हणाले. “माझ्या नावाची चर्चा सुरु झाल्यापासून अनेकांनी फोन करुन सांगितलं, आम्ही तुमच्यासोबत आहोत. समोर कोण उमेदवार आहे, यापेक्षा समोरचा उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार झाला. त्यांच्याशी माझ काही वैर नाही. पण ही निवडणूक जर जनतेने हातात घेतली, तर अपेक्षेपेक्षा पण मोठी क्रांती होईल” असं शशिंकात शिंदे म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.