Ganesh Naik Case : गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या दीपा चौहान म्हणतात, मला राष्ट्रवादी पक्ष पहिल्यापासूनच आवडतो! राष्ट्रवादीत प्रवेश नक्की?

दीपा चौहान यांना विचारलं असता 'मला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पहिल्यापासूनच आवडतो. महिला आयोगाने माझी मदत केली आहे. मला राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करायचा आहे. तसं पत्रही मी दिलं आहे', अशी माहिती दीपा चौहान यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

Ganesh Naik Case : गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या दीपा चौहान म्हणतात, मला राष्ट्रवादी पक्ष पहिल्यापासूनच आवडतो! राष्ट्रवादीत प्रवेश नक्की?
गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या दीपा चौहान राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यताImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 7:02 PM

रवी खरात, नवी मुंबई : भाजप नेते आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर दीपा चौहान या महिलेने लैंगिक अत्याचारासारखा गंभीर आरोप केलाय. नाईक यांच्यासोबत मी पूर्व संबंधात होते. त्या संबंधातून मुल झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर अनेकवेळा जबरदस्ती केली, माझं लैंगिक शोषण झालं, असा आरोप चौहान यांनी केला आहे. गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी कोर्टात अर्जही सादर केलाय. दरम्यान, नाईक यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या दीपा चौहान (Deepa Chauhan) या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. त्याबाबत त्यांनी एक पत्र लिहून पक्षाला तशी विनंतीही केली आहे. त्याबाबत खुद्द दीपा चौहान यांना विचारलं असता ‘मला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पहिल्यापासूनच आवडतो. महिला आयोगाने (Women Commission) माझी मदत केली आहे. मला राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करायचा आहे. तसं पत्रही मी दिलं आहे, अशी माहिती दीपा चौहान यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

दीपा चौहान यांना राष्ट्रवादीत प्रवेश मिळणार?

दीपा चौहान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केलीय. काल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षा प्राजक्ता मोडकर यांना पत्र लिहून आपल्याला पक्षात काम करण्याची संधी मिळावी अशी विनंती केली आहे. पण अजून उत्तर आलं नाही. आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आज भेट घेतली. मात्र, पक्षप्रवेशाबाबत बोलणं झालं नाही. मला समाजसेवा करायची आहे’, अशी प्रतिक्रिया दीपा चौहान यांनी दिलीय. दीपा चौहान यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षात प्रवेश दिल्यास गणेश नाईकांच्या अडचणीत अजून भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पीडित महिलेचा नेमका आरोप काय?

गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान यांनी गंभीर आरोप केलेत. माझ्या न्याय हक्कासाठी मी लढाई लढत आहे. गेली 27 वर्षे मी गणेश नाईक यांच्या संपर्कात आणि संबंधात होते. गणेश नाईक मला नुसते आश्वासन द्यायचे. आमच्या संबंधातून मला एक मुलगाही आहे. नाईकांनी मला आश्वासन दिलं होतं की, मुलगा पाच वर्षाचा झाल्यानंतर मी वडील म्हणून त्याला नाव देईन. परंतू त्यांनी तसं काहीच केलं नाही. नाईकांनी आम्हाला कोणतंच आर्थिक पाठबळ दिलं नाही. नाईक यांच्यासोबत मी पूर्वी संबंधात होते. त्या संबंधातून मुलगा झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर अनेकवेळा जबरदस्तीही केली. माझं लैंगिक शोषण झालं, असा चौहान यांनी केलाय.

हे सुद्धा वाचा

तसंच नाईक आणि त्यांच्या परिवारानं मला अनेकवेळा अपमानास्पद वागणूक दिली. अनेकवेळा त्यांच्या मुलाकडून मला धमक्याही देण्यात आल्या. एकदा माझा मुलगा त्यांच्या बालाजी टॉवर या राहत्या घरी गेल्यावर त्याला हाकलून देण्यात आलं. त्यानंतर मी स्वत: मुलाला घेऊन गेल्यानंतर आम्हाला हाकलून देत, अपमानास्पद वागणूक देण्यात आली.

माझा शारीरिक आणि मानसिक छळ नाईक यांनी केलाय. आता त्यांच्याविरोधात अनेक संघटना, पक्ष पुढे येत आहेत. त्यांच्या अटकेची मागणी होतेय. पण मला त्याबाबत काही बोलायचं नाही. मला न्याय आणि माझा हक्क मिळाला पाहिजे. मी वकिलामार्फत माझी लढाई लढत आहे, अशी माहितीही चौहान यांनी दिलीय.

महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....