Congress| कोण आहेत गौरव पांधी? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या टीमचा सर्वात तरुण चेहरा, राहुल गांधींशी संबंध कसे?
Who is Gaurav Pandhi? हा प्रश्न अनेकांना पडलाय. कारणही महत्त्वाचं आहे. काँग्रेसच्या नव्या टीममध्ये गौरव पांधींना महत्त्वाचं स्थान मिळालंय.
नवी दिल्लीः काँग्रेसचे नवे अध्यक्ष (Congress President) मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) भाजपाचा वाढता प्रभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी काय पावलं उचलतात, याकडे देशाचं लक्ष लागलंय. काँग्रेसने (Congress) अनेक वर्षानंतर गांधी घराण्याव्यतिरिक्त दुसऱ्या नेत्याकडे अध्यक्षपद सोपवलंय. या पदावर विराजमान झालेल्या मल्लिकार्जून खरगे यांनी नुकतीच नवी टीम सिलेक्ट केली आहे. त्यात गौरव पांधी यांचं नाव चर्चेत आहे.
मल्लिकार्जून खरगे यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोऑर्डिनेटर म्हणून चौघांची नियुक्ती केली आहे. हे नेते पक्षाध्यक्ष कार्यालयाचे कामकाज पाहतील. खरगे यांच्या या चौघांच्या टीममध्ये सर्वात तरुण चेहरा आहे गौरव पांधी यांचा. नव्या काँग्रेस अध्यक्षाच्या ऑफिसमधील हे चार महत्त्वाचे व्यक्ती असतील. गौरव पांधी हे काँग्रेस नेता राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. पक्षातील अंतर्गत समीकरणं तसेच योग्य संतुलन साधण्याकरिता पांधी यांची ही नियुक्ती महत्त्वाची मानली जातेय.
खरगे हे काँग्रेसच्या जुन्या टीमचे सदस्य आहेत. त्यामुळे मी सर्वांनाच सोबत घेऊन चालतो, हे दर्शवण्याचा खरगेंचा प्रयत्न आहे. या टीममधील इतर तीन नावं खासदार सय्यद नासिर हुसैन, प्रणव झा आणि गुरदीप सिंह सप्पल अशी आहेत. गुरदीप सिंह सप्पल हे पक्षाचे प्रवक्ता आहेत. तर प्रणव झा एआयसीसीचे सचिव होते.
गौरव पांधी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलमध्ये सक्रिय आहेत. सोशल मीडियातील पक्षाच्या प्रतिमेबाबत गौरव पांधी अलर्ट असतात. १० वर्षांपूर्वी ते स्वयंसेवक म्हणून काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसच्या त्या काळच्या सोशल मीडिया टीमचे भाग बनले. म्हणजेच मागील दशकभरात काँग्रेसच्या सोशल नेटवर्किंगचा ते महत्त्वाचा भाग आहेत.
Humbled to receive this prestigious responsibility!
I thank Hon’ble Congress President Shri Mallikarjun Kharge for showing faith in my capabilities.
My gratitude to former Congress Presidents Smt Sonia Gandhi & Shri Rahul Gandhi for their belief & trust in me. (1/2) pic.twitter.com/9kFBDaLfoE
— Gaurav Pandhi (@GauravPandhi) November 16, 2022
खरगे यांच्या टीममध्ये नियुक्ती झाल्यानंतर गौरव पांधी यांनी ट्विट करत पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. क्षमतांवर विश्वास दाखवल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना त्यांनी धन्यवाद दिले.