girish bapat ! बॉलिवूड उत्तर प्रदेशात जाणार?; गिरीश बापट म्हणतात…
बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यावर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे (girish bapat reaction on Parallel Bollywood Industry in uttar pradesh)
पुणे: बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यावर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बॉलिवूड असो किंवा इतर सांस्कृतिक क्षेत्र यात काम करायला मोठी संधी आहे. अशी कामं होत असतील तर त्याला प्रोत्साहनच दिलं पाहिजे, असं विधान बापट यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (girish bapat reaction on Parallel Bollywood Industry in uttar pradesh)
पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सहकुटुंब जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. अहिल्यादेवी शाळेच्या मतदान केंद्रावर त्यांनी आपलं मतदान केलं. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले आहेत. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा सवाल बापट यांना करण्यात आला. तेव्हा, योगी आदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर आहेत. बॉलिवूड असो किंवा इतर सांस्कृतिक क्षेत्र यात काम करायला मोठी संधी आहे. अशी कामं झाली तर आनंद व्यक्त करायला हवा, दुःख व्यक्त करण्याचं कारण नाही. योगी आदित्यनाथ यांच उत्तर प्रदेशातलं काम हे अभिनंदनीय आहे, असं बापट म्हणाले.
दरम्यान, खासदार गिरीश बापट यांनी पदवीधर निवडणुकीत मागच्या निवडणुकीपेक्षा यंदा अधिक मतदान होणार असल्याचा दावा केला. तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या सर्वच उमदेवारांचा विजय होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. राज्यात आघाडी सरकारच्या विरोधात मोठी नाराजी आहे. अनेकांचे प्रश्न सुटले नाहीत आणि यंदाच्या निवडणुकीत भाजप घवघवीत यश मिळवेल कारण संघटनात्मक काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलंय. त्यामुळे आम्हाला विजयाचा विश्वास आहे. मतदारांना महाविकास आघाडी सरकारला धक्का देण्याची मोठी संधी आहे, आणि ती संधी मतदार भाजपला देतील, असंही ते म्हणाले.
त्यांच्याच वजनाने सरकार पडणार
यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीवरही टीका केली. हे अपयशी सरकार आहे. कोरोनाच्या कामातही हे सरकार अपयशी झाले असून ठाकरे सरकार सपशेल नापास झाले आहे. हे सरकार पाडण्याची गरज नाही. सरकार आपल्याच वजनाने आपोआप पडेल, असा दावाही त्यांनी केला. पदवीधरांच्या निवडणुकीपासून राज्यात नव्या परिवर्तनाला सुरुवात होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. (girish bapat reaction on Parallel Bollywood Industry in uttar pradesh)
VIDEO | Graduate Election | पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबादहून पदवीधर, शिक्षक मतदारसंघात मतदान https://t.co/ABGjBaJdS7 @BJP4Maharashtra @ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra @mnsadhikrut #ElectionDay2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2020
संबंधित बातम्या:
कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा
उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधातील कठोर कायद्याला राज्यपालांची मंजुरी
(girish bapat reaction on Parallel Bollywood Industry in uttar pradesh)