देवेंद्र फडणवीसांनी खडसेंवर अन्याय केला नाही: गिरीश महाजन

एकनाथ खडसेंच्या पक्षातरांमुळे पक्षाचे तात्पुरते क्षणिक नुकसान नक्कीच होईल. पण, कोणीही मोठा नेता त्यांच्याबरोबर जाणार नाही, असं भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.(Girish Mahajan comment on Eknath Khadse decision quit from BJP)

देवेंद्र फडणवीसांनी खडसेंवर अन्याय केला नाही: गिरीश महाजन
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 5:31 PM

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी  भाजपचा राजीनामा दिल्याचे पत्रकार परिषद घेत जाहीर केले. यानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. नाथाभाऊ आमचे मोठे नेते होते, त्यांच्या पक्षातरांमुळे पक्षाचे तात्पुरते क्षणिक नुकसान नक्कीच होईल. पण, कोणीही मोठा नेता त्यांच्याबरोबर जाणार नाही, असं भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.(Girish Mahajan comment on Eknath Khadse decision quit from BJP)

पक्षांतरासारख्या घटना राजकारणात होत असतात. देवेंद्र फडणवीस आणि इतर कुणीही कुठल्या प्रकारचा त्यांच्यावर अन्याय केला नाही, असे महाजनांनी म्हटले. एकनाथ खडसेंच्या पक्षांतरावर भाजप नक्कीच आत्मचिंतन करेल. शुक्रवारी त्यांच्यासोबत कोण कोण जाणार आहे ते कळेलच,असे महाजनांनी म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आत्मचिंतन करायला सांगितले. पण, शिवसेनेतूनही छगन भुजबळ, नारायण राणे या सारखे नेते सोडून गेले होते. याची आठवण महाजनांनी उद्धव ठाकरेंना करुन दिली.

सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे पक्ष सोडणे कार्यकर्ता म्हणून धक्कादायक, असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. खडसेंनी निर्णयाचा त्यांनी पुनर्विचार करावा किंवा ते गेलेच तर सुखी राहावे, असं मत मुनंगटीवार यांनी व्यक्त केले. भाजप कुण्या एकाचा पक्ष नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाला या घडामोडीवर चिंतन करण्याची गरज आहे.

भाजप विस्तारात खडसेंचे मोठे योगदान, खडसेंनी राष्ट्रवाद जोपासणारा पक्ष ते राष्ट्रवादाचा बुरखा घालणा-या पक्षात जाणे वेदनादायी आहे. सत्ता नसताना त्यांनी पक्षासाठी कार्यकर्ता बांधून ठेवला आता त्यांचा धीर खचला याबद्दल आश्चर्य वाटते, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

ओहोटी संपली आता भरती येणार, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर रोहित पवारांचे सूचक ट्विट

ज्या पक्षाने छळलं त्याच पक्षात नाथाभाऊंनी जाणं हे दुर्दैवी : रावसाहेब दानवे

(Girish Mahajan comment on Eknath Khadses decision quit from BJP)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.