“ईडीची तारीख आली की खडसेंना कोरोना होतो”, गिरिश महाजनांचा खोचक टोला

ईडीकडून चौकशीची तारीख आली की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोना होतो," असा खोचक टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी लागवला. (girish mahajan eknath khadse corona)

ईडीची तारीख आली की खडसेंना कोरोना होतो,  गिरिश महाजनांचा खोचक टोला
एकनाथ खडसे आणि गिरिश महाजन
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 3:50 PM

जळगाव : “ईडीकडून चौकशीची तारीख आली की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना कोरोना होतो,” असा खोचक टोला भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लगावला. ते ‘टीव्ही 9 माराठी’शी जळगावमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी खडसेंवर जोरदार प्रहार केले. (Girish Mahajan criticizes Eknath Khadse on ED  enquiry and Corona infection)

महाजन यांची खडसेंवर खोचक टीका

राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर कधी लपून राहिलेले नाही. वेळ मिळेल तेव्हा हे दोन्ही नेते एकमेकांर जोरदार टीका करताना दिसतात. भाजपमध्ये झालेल्या कोंडीमुळे खडसे यांनी पक्षांतर केल्यामुळे तर गिरीश महाजन त्यांच्यावर उघडपणे शाब्दिक प्रहार करताना दिसतात. यावेळीदेखील महाजन यांनी खडसेंना घेरण्याची संधी सोडली नाही. मागील काही दिवासांपासून खडसेंच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ठ लागलेले आहे. तसेच आतापर्यंत खडसे यांना तीन वेळा कोरोनाची आणि कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आली आहेत. या दोन्ही गोष्टींचा संदर्भ घेऊन महाजन यांनी खडसेंना घेरलंय. जेव्हा जेव्हा ईडीकडून चौकशीची तारीख येते, तेव्हा तेव्हा खडसे यांना कोरोनाची लागण होते; असं म्हणत महाजन यांनी खडसेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

खडसेंना यापूर्वी कितीवेळा कोरोना झाला?

राज्यात कोरोना महामारीचा संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. खडसेंनासुद्धा आतापर्यंत तीन वेळा कोरोना आणि कोरोनासदृश लक्षणे दिसून आली आहेत. त्यांची सर्वांत अधी 19 नोव्हेंबर 2020 रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. ट्विटरवर त्यांनी तशी माहिती दिली होती. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी पुन्हा त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने डॉक्टरांनी त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला दिला होता. त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

रक्षा खडसे यांनासुद्धा कोरोनाची लागण

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. 18 फेब्रुवारी रोजी रक्षा खडसे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली होती

इतर बातम्या :

Pandharpur Bypoll: भाजप आणि राष्ट्रवादीचं सोडा, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकलेंची एन्ट्री

लॉकडाऊनवरुन बेबनाव सुरुच, आधी टोपे म्हणाले, माणसं महत्त्वाची, आता पटेल म्हणतात, लॉकडाऊन पर्याय नाही

लॉकडाऊनच्या दिशेने आणखी एक पाऊल, 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी ठेवण्याचे आदेश

(Girish Mahajan criticizes Eknath Khadse on ED  enquiry and Corona infection)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.